अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद
- काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या
पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा शुभारंभ
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी बुधवारी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या प्रचार रॅलीचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरवात केली. यावेळी उपस्थितांनी बागुल यांचा प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रारंभी पासून काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या श्री बागुल यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी, त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात काँग्रेस भवन येथूनच केली. अजय खुडे, विश्वास दिघे,इंदिरा आहिरे,जयकुमार ठोंबरे, शोभा पण्णीकर, संतोष गेळे, बेबी राऊत, गोरख मरळ, अशोक नेटके, सुमन इंगवले, ज्योती आरवेन, नीता नेटके, शाम काळे, दीपक ओव्हाळ, छाया गाडे, ताई कसबे, नंदा ढावरे, प्रकाश आरणे, रावसाहेब खवळे, जावेद शेख, माहेबूब शेख, अल्ताप सौदागर, नितीन निकम, मनीषा गायकवाड, सुनील ओव्हाळ, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री आबा बागुल यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीचे बुधावरी सकाळी आयोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता शिवदर्शन येथील राजीव गांधी ई लर्निग स्कूल येथून ही दुचाकी रॅली सुरू झाली. या रॅलीत तरुणाई बरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी आबा बागुल हम तुम्हारे साथ हे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान पर्वती मतदार संघातील काँग्रेसचे शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. आबा तुम्ही घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. आम्ही आपल्या मागे खंबीरपणे उभे आहोत, तुमचा विजय निश्चित आहे, आशा भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या.
ही बाईक रॅली राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग – लक्ष्मी नगर – पर्वती गाव – जनता वसाहत – हिंगणे – महादेवनगर – आनंदनगर – विठ्ठलवाडी – दत्तवाडी – गणेशमळा -पानमळा – दांडेकर पूल – निलायम ब्रिज येथून पुढे पर्वती दर्शन येथे समाप्त झाली. वाहतुकीला अडथळा येऊ नये अशा पद्धतीने रस्त्यावरून या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात होते.पर्वती मतदार संघातील परिवर्तनासाठी या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अशा भावना श्री आबा बागुल यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण काँग्रेसचे विचार जे महात्मा गांधी यांनी दिले ते कायम पुढे ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.
या रॅली दरम्यान नागरिकांनी ही आपल्या भावना व्यक्त करून, पर्वती विधानसभा मतदार संघातील न झालेल्या विकास कामाबद्दल खंत व्यक्त केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार चुकला आसून, अजूनही वेळ गेलेली नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकाने पडून आपली क्षमता दाखवून देणार आहे. त्यापेक्षा महाविकास आघाडीने आबा बागुल यांना पाठींबा द्यावा असे मत नागरिकांनी व्यक्त केले.