नागपूर दि. २५ सप्टेंबर २०२४
नागपूर महानगरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडले असून शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार आहे हे निश्चित झाले आहे त्यामुळे राज्य भरात विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे महाराष्ट्र प्रदेश ओबीसीं सेलच्या सरचिटणीस कल्पनाताई मानकर, धनराज फुसे, राष्ट्रवादीचेच सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद ढेंगरे, यांच्या नेतृत्वात राजकुमार जी वानखेड़े योगेश धनराज फुसे, राजेश कुहीकर, राधेश्याम म्हात्रे, ज्योती ताई सोमकुंवर , संदीप वानखेड़े , लीला बारापात्रे, मंदा गनवीर ,राजू रामटेके , महेश भाई ,बिरजू धीमान , जावेद भाई शेख, असलम शेख, अज़हर शेख यांच्यासह नागपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात केवळ काँग्रेसच्या नेतृत्वातच प्रगतीशील, स्थिर व मजबूत सरकार मिळू शकते. राहुल गांधी यांचे देशाच्या विकासचे व्हीजनच देश एकसंध ठेवत देशाला खर्या अर्थाने जागतिक महासत्ता बनवू शकते, असे मनोगत प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या प्रवेशामुळे नागपूर महानगरात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत झाली आहे.