स्वरप्रज्ञा म्युझिक अकॅडमीचा रंगला वार्षिकोत्सव
पुणे : ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगनमें’, ‘इचकदाना बिचकदाना’, ‘वो चाँद खिला वो तारे हँसे’, ‘जवाँ है मुहब्बत हँसी है जमाना’ अशा अनेक कर्णमधुर गीतांनी पुणेकरांची संध्याकाळ मंत्रमुग्ध करणारी ठरली. निमित्त होते स्वरप्रज्ञा म्युझिक अकॅडमी आयोजित ‘गुजरा हुआ जमाना’चे.
’स्वरप्रज्ञा च्या वार्षिकोत्सवाअंतर्गत 1950 ते 1980 या काळातील हिंदी संगीताच्या सुवर्ण युगाची ही सफर घडवून आणली ती अकादमीच्या 20 विद्यार्थ्यांनी. कार्यक्रमाची सुरुवात दिगंबर केशवराव गुंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मिलिंद उपाध्ये यांच्या हस्ते दिगंबर गुंडे यांचा सत्कार करण्यात आला. हॅपी कॉलनी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात बालचमूंनी सादर केलेल्या ‘तुम आशा, विश्वास हो’ या प्रार्थनेने झाली तर समारोप ‘सारे के सारे गामा को लेकर गाते रहे’ या गीताने झाला.
अकादमीच्या संचालिका प्रज्ञा देशपांडे यांच्या तालमीत तयार झालेल्या अस्मी कुलकर्णी, निधी अभ्यंकर, सारिका गोडबोले, साधना वझे, योजनगंधा मराठे, मैथिली बलवल्ली, प्रशांत कुलकर्णी, अक्षरा भागवत, तृप्ती कुलकर्णी-जागुष्टे, मयुरी तानवडे, हिमांशू मांजरेकर, मीरा बडवे, अद्वैत कुलकर्णी, अमीत जोशी, स्वरा कुलकर्णी, ईश्वरी वरुडकर, ग्रीष्मा खाडीलकर, मृण्मयी जोशी, ऋजुता मराठे या कलाकारांनी श्रवणीय गीते सादर केली. त्यांना विजय उपाध्ये (हार्मोनियम), अमन सय्यद (किबोर्ड), अतुल गर्दे (गिटार), राजेंद्र हसबनीस (तबला), रोहित साने (रिदम मशीन) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन डॉ. मानसी अरकडी यांनी केले.
‘नन्हा मुन्ना राही हू’ं, ‘सैंय्या दिलमें आना रे’, ‘फिर वही शाम वही तनहाई है’, ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने’, ‘नाम गुम जायेगा’, ‘पिया बावरी’, ‘भँवरे की गुंजन है मेरा दिल’, ‘फिर वही शाम वही गम’, ‘जवाँ है मुहब्बत हँसी है जमाना’, ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुनें’, ‘पिया बावरी’, ‘दिल चीज क्या है आप मेरी’ आदी श्रवणीय गातांचे स्वर सभागृहात निनादत राहिले. नूरजहाँ, शमशाद बेगम, महंमद रफी, जगजीत सिंग, गुलजार आदींच्या सुरेल मेडलीने कार्यक्रमात रंग भरले.