कायदे क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान व कल्पनांवर लक्ष केंद्रित करणारे नवीन ‘सेंटर फॉर द फ्यूचर ऑफ लॉ‘ तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यू बांधील आहे
बंगलोर, २२ सप्टेंबर, २०२४: देशात कायद्याच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात एक लक्षणीय टप्पा असलेल्या जेएसडब्ल्यू अकॅडेमिक ब्लॉकचा पायाभरणी समारंभ भारताचे मुख्य न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या हस्ते आज पार पडला. बंगलोरमधील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडेमिक ब्लॉकचा सर्वसमावेशक पुनर्विकास आणि विस्तार जेएसडब्ल्यू अकॅडेमिक ब्लॉकच्या रूपाने करण्यात येत आहे.
प्रस्तावित योजनेनुसार, सध्याच्या इमारतीचे रूपांतर एका बहुमजली संरचनेमध्ये केले जाईल, त्यामध्ये अत्याधुनिक लेक्चर थिएटर्स, सेमिनल कक्ष, फॅकल्टी ऑफिसेस आणि कोलॅबोरेटीव्ह रिसर्च स्पेसेस असतील. या अत्याधुनिक सुविधांमुळे विद्यार्थी व संशोधकांना प्रगत शिक्षण वातावरणाचे लाभ घेता येतील, वेगाने बदलत असलेल्या कायदा क्षेत्रात स्वतःचा उत्कर्ष साध्य करता येईल.
जेएसडब्ल्यू ग्रुपकडून मिळालेल्या अनुदानामुळे हा प्रकल्प संभव होत आहे. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमधील शैक्षणिक पायाभूत सोयीसुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या व्यापक सहयोगांचा हा एक भाग आहे. या अनुदानामधून अकॅडेमिक ब्लॉकचे काम केले जाईल, तसेच ‘जेएसडब्ल्यू सेंटर फॉर द फ्युचर ऑफ लॉ‘ ची स्थापना केली जाईल. कायदा क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रगतीमुळे निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी तसेच या क्षेत्रातील नवीन आव्हाने दूर करण्यासाठी हे अत्याधुनिक संशोधन केंद्र डिझाईन करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल प्रायव्हसी, ऑटोमेशन आणि नवीन तंत्रज्ञानाचे नैतिक परिणाम यासारख्या विषयांवर संशोधनामध्ये हे केंद्र आघाडीवर राहील. शिक्षणक्षेत्रातील व्यक्ती, सरकारी विभाग, नियामक अधिकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये समन्वय घडून येऊन कायदेशीर नियमनाचे नवीन मॉडेल्स विकसित करण्यासाठी व अत्याधुनिक कायदा तंत्रज्ञानाची मुळे रुजवली जावीत यासाठी हे केंद्र प्रयत्नशील राहील.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते – भारताचे ऍटर्नी जनरल, श्री आर. वेंकटरामानी; बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, श्री मनन कुमार मिश्रा; जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा, श्रीमती संगिता जिंदल; आणि जेएसडब्ल्यू सिमेंट व जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री पार्थ जिंदल.
जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री सज्जन जिंदल म्हणाले, “जेएसडब्ल्यूमध्ये आमचा शिक्षणाच्या परिवर्तन शक्तीवर ठाम विश्वास आहे. अकॅडेमिक ब्लॉकचा विकास आणि जेएसडब्ल्यू सेंटर फॉर द फ्यूचर ऑफ लॉची स्थापना या फक्त सुविधा नाहीत तर कायदा आणि तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलत चाललेल्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी कायदा व्यावसायिकांच्या नव्या पिढीला तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. राष्ट्रनिर्मितीवर शाश्वत प्रभाव निर्माण करतील अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या आमच्या व्हिजनला अनुरूप अशी ही भागीदारी आहे.”
जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता जिंदल यांनी याच्या दीर्घकालीन लाभांवर प्रकाश टाकला, त्या म्हणाल्या, “नॅशनल लॉ स्कूल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीमध्ये आम्ही करत असलेल्या गुंतवणुकीचा उद्देश एक असे वातावरण निर्माण करण्याचा आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान मिळवण्याबरोबरीनेच समाजातील आव्हाने दूर करण्यासाठी देखील सक्षम केले जाईल. आम्ही असे मानतो की, भारतामध्ये कायद्याच्या भविष्याला असे प्रोफेशनल आकार देतील जे न्याय व समानतेच्या तत्त्वांची पाठराखण करत असताना नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यासाठी देखील तयार असतील. जेएसडब्ल्यू अकॅडेमिक ब्लॉक आणि सेंटर फॉर द फ्यूचर ऑफ लॉ हे व्हिजन पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.”
जेएसडब्ल्यू सिमेंट आणि जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री पार्थ जिंदल यांनी सांगितले, “कायदा क्षेत्रात तंत्रज्ञान खूप मोठे परिवर्तन अतिशय वेगाने घडवून आणत आहे. कॉन्ट्रॅक्ट ऍनालिसिससाठी एआय–सक्षम टूल्सपासून लिटिगेशनमध्ये ऑटोमेशनपर्यंत अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. जेएसडब्ल्यू सेंटर फॉर द फ्यूचर ऑफ लॉमुळे नॅशनल लॉ स्कूल इंडिया युनिव्हर्सिटी या सर्व नवनवीन विकासामध्ये आघाडीवर राहू शकेल, भविष्यातील कायदा व्यावसायिकांना या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यासाठी तसेच त्याचे नियमन करण्यासाठी तयार केले जाईल. नॅशनल लॉ स्कूल इंडिया युनिव्हर्सिटीसोबत आमची भागीदारी भविष्यातील नेत्यांना सक्षम करणाऱ्या, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी निर्माण करण्याप्रती जेएसडब्ल्यूची बांधिलकी दर्शवते.”
ही भागीदारी करून जेएसडब्ल्यू ग्रुप आणि नॅशनल लॉ स्कूल इंडिया युनिव्हर्सिटी भारतामध्ये कायदा शिक्षणाच्या भविष्याला आकार देण्यासाठी, हे शिक्षण अधिक समावेशक, तंत्रज्ञानावर आधारित आणि या व्यवसायात घडून येत असलेल्या बदलांना अनुरूप असावे यासाठी एकत्र मिळून काम करण्यासाठी बांधील राहतील.