गणेश विसर्जन मिरवणूक म्हटली कि लहान मुलांना आकर्षण असतेच , यात्रे प्रमाणे या मिरवणुकीत देखील वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रेते असतात , आणि बूढ़ी के बाल विक्रेत्याच्या भोवती घुत्माल्णारे पोरे मंत्री असलेल्या चंद्रकांत दादांना दिसली आणि त्यांच्यातला साधा माणूस पुढे सरसावला चक्क चंद्रकांत दादांनी बूढ़ी के बाल विकत घेतले… एकामागे एक करत बरेच घेत गेले आणि तसे ते वाटत हि गेले .. स्वतासाठी १ ठेवून घेऊन ..
राजकीय जीवनात काम करणारा कार्यकर्ता यशस्वी झाला की त्याच्या डोक्यात सत्तेची नशा चढते असे म्हणतात. पण सत्तेची ही नशा डोक्यात न जाऊ देता; साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा जीवनमंत्र मानून सार्वजनिक काम करणाऱ्या व्यक्ती या दैवदुर्लभ असतात. अन् हीच माणसे समाजाची श्रीमंती असतात.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे असेच व्यक्तिमत्त्व या मिरवणुकीत दिसले त्यात संदीप खर्डेकर सोबत … मग काय विचारता …
दादा नेहमीच आपल्या साधेपणाबाबत चर्चेत असतात. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचा हा साधेपणा संपूर्ण पुणेकरांना पुन्हा अनुभवायला मिळाला.आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सर्व पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री इतके एकरुप झाले की, उपस्थित सर्वच आवाक झाले.कारण, विसर्जनाला जाणाऱ्या मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर; त्यांनी सर्वात आधी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता उपलब्ध करुन दिला. त्यानंतर मिरवणुकीचा मनमुराद आनंद लुटला. कधी ढोल पथकांच्या ठेक्यावर ताल धरला. तर कधी ध्वज पथकात सहभागी होऊन सलामी दिली. एवढंच कशाला लहान मुलांच्या आवडीचे शुगर कॅन खरेदी करुन लहान मुलांना वाटप केलं. यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत अनेक लहान मुले महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यात ही त्यांनी आनंद मानला.
खरंतर चकाकते ते सगळेच सोने नसते. जे आहे, जसे आहे ते झळाळून व्यक्तिमत्त्व उन्नत करण्याचे काम साधेपणा करीत असतो. साधेपणाची जीवनशैली अंगीकारली; तर केवळ व्यक्तिमत्त्वाचीच नव्हे; तर जगण्याचीही उंची वाढते . आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या मिरवणुकीतील या दर्शनाने साधेपणाने अनेकांना भुरळ पाडली नाही तरच नवल …..
- अभिषेक लोणकर