पुणे – लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नुकतीच दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे नेते तरविंदर सिंग मारवा यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला जर अशा धमक्या भाजपाचे नेते देऊ लागले तर भाजपच्या या राज्यात सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील हे आपणास दिसून येते.आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तरविंदरसिंह मारवावर गांधी फॅमिलीवर झालेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी पाहता कठोरात कठोर कारवाई व्हावी व त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर सौ. कमल व्यवहारे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, रफिक शेख, अविनाश साळवे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, प्रभाग अध्यक्ष मुन्ना खंडेलवाल इत्यादी उपस्थित होते.