पुणे-पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यावत शाखेवर दरोडा घालणाऱ्या ७ जणांच्या टोळीला शिवाजीनगर न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
यवत पाेलीस स्टेशनच्या हद्दीत १०/९/२०१६ राेजी दाैंड तालुक्यात राहु या गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत सशस्त्र दराेडा टाकून बँकेतून ६५ लाख रुपयांची राेख रक्कम दराेडेखाेरांनी लुटली हाेती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखे व यवत पाेलिसांनी तपास करत, सतीश अाप्पासाहेब इथापे टाेळीस अटक केली. त्यांच्यावर माेक्का अंर्तगत दहा अाराेपींवर कारवाई करण्यात अाली हाेती. याबाबतची सुनावणी शिवाजीनगर न्यायालयात हाेऊन विशेष न्यायालयाने चार अाराेपींना जन्मठेपची व प्रत्येकी दहा लाख रुपये दंडाची व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली अाहे. तर, तीन अाराेपींना सात वर्ष सक्तमजुरी व १० लाख रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी शिक्षा सुनावण्यात अाली अाहे.
सचिन अाप्पा ऊर्फ अाप्पासाहेब ऊर्फ भाऊसाहेब इथापे ऊर्फ शिवाजी अाप्पा पाटील (वय-२८,रा. चाळीसगाी, जळगाव, मु.रा.काेंडेगव्हाण, ता.श्रीगाेंदा, अहमदनगर), रामदास ऊर्फ पप्पु ऊर्फ झिंग्या ऊर्फ समीर यशवंत ढगे (२७,रा.चांबुर्डी, ता.श्रीगाेंदा, नगर), पृथ्वीराज ूर्फ पतंग दत्तात्र्य माने (२७,रा. कन्हेरगाव, ता.माढा, साेलापूर), मारुती ऊर्फ पिंटया शिवाजी सरडे (२३,रा.कन्हेरगाव, ता.माढा,साेलापूर ) या अाराेपींना जन्मठेप शिक्षा सुनावण्यात अाली अाहे. तर, सतीश अाप्पा इथापे ऊर्फ सतीश अाप्पा पाटील (३०,रा.चाळीसगाव, जळगाव), मंगल अाप्पा इथापे (४६,रा.चाळीसगाव, जळगाव), प्रियंका ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली लाेकरे ऊर्फ प्रियंका दिपक देशमुख (२४,रा.चाळीसगाव, जळगाव) या अाराेपींना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात अाली अाहे.
याप्रकरणात तुषार शिवाजी सरडे (रा.कन्हेरगाव, ता.माढा, साेलापूर)ल ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगन्नाथ लाेकरे ऊर्फ दिपक दादासाे देशमुख (रा.चाळीसगाव, जळगाव. मु.रा.टेंभुणी, साेलापूर), बबलु ऊर्फ बिसेट साळवे (रा.अहमदनगर) या अाराेपींवर गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता तेव्हापासून साळवे व लाेकरे फरार झाले अाहे.तर, तुषार सरडे यास न्यायालयाने निर्दाेष साेडले अाहे. या गुन्हयाचा तपास तत्कालीन एलसीबीचे पाेलीस निरीक्षक राम जाधव, त्यांचे तत्कालीन सहकारी , यवत पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण, एपीअाय विलास नाळे, पाे.हवा.महेश बनकर यांनी गुन्हयाचा तपास करुन गुन्हयाचे तपासात गाेपनीय माहिती काढून व तांत्रिक विश्लेषण करुन अाराेपी नावे निष्पन्न करत त्यांच्यावर अटक कारवाई केली.
याबाबत सदर टाेळीवर माेक्का कारवाई देखील करण्यात अाली हाेती. सन २०१७ मध्ये याप्रकरणात न्यायालयात अाराेपपत्र दाखल करण्यात अाले हाेते. सरकारी वकील चंद्रकिरण साळवी व पाेलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले अशी माहिती पुणे ग्रामीण पाेलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.