पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचाही सहभाग
पुणे-३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंटम’ आज संपन्न झाली. पुण्यातील येरवडा येथील ‘पुणे गोल्फ कोर्स’ येथे सकाळी ६.३० वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धा स्टेबलफोर्ड फॉरमॅटमध्ये गोल्ड व सिल्व्हर अशा डिवीजनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत १३० स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये पुणे व परीसरातील विविध कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापक देखील सहभागी होते. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यात सहभाग घेऊन गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला. पूना क्लबचे उपाध्यक्ष गौरव घडोक, गोल्फ क्लबचे इकरम खान, अपूर्व कुमार, सलील भार्गव, ऋषी भोसले, इंद्रनील मुजगुले, मोहनीश ठाकूर अशा अनेक नामवंतांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण शनिवार दि. १४ सप्टें. रोजी सायंकाळी येरवडा गोल्फ क्लब येथे संपन्न होईल. या स्पर्धेचे संयोजन पूना क्लबने केले.