मुंबई- शाहरुख खानने 2024 या आर्थिक वर्षासाठी 92 कोटी रुपये कर भरला आहे. तो सर्वाधिक कर भरणारा भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. त्याची एकूण संपत्ती 7300 कोटी रुपये आहे.दुसऱ्या स्थानावर तामिळ सुपरस्टार थलापथी विजय आहे ज्याने 80 कोटी कर भरला आहे. त्याची एकूण संपत्ती 800 कोटी रुपये आहे. या यादीतील टॉप-5 मध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान यांचा समावेश आहे.
सर्वाधिक कर भरणारा क्रिकेटपटू विराट कोहली आहे. त्याने 66 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा क्रमांक लागतो, ज्याने 38 कोटी कर भरला आहे.शाहरुख खान जगातील तिसरा श्रीमंत अभिनेता बनला आहे. त्याची एकूण संपत्ती 7,300 कोटी रुपये आहे. शाहरुखने 2023 मध्ये जवान आणि पठाण हे सलग दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या दोघांनी जगभरात 2000 कोटींहून अधिक कमाईचा टप्पा ओलांडला आहे.
शाहरुखने हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजलाही मागे टाकले आहे. टॉम क्रूझची एकूण संपत्ती 5,000 कोटी रुपये आहे. टायलर पेरी 11,700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह जगात पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गेरी सेनफील्ड असून त्यांची एकूण संपत्ती 9000 कोटी रुपये आहे.
थलपथी विजय हा तमिळ चित्रपट उद्योगातील सर्वात मोठा करदाता आहे. त्याने 80 कोटी कर भरला आहे. विजयची एकूण संपत्ती 800 कोटी रुपये आहे. त्याच्या 2023 च्या वारिसू या चित्रपटाने जगभरात सुमारे 300 कोटी रुपयांची कमाई केली आणि लिओने 612 कोटी रुपयांची कमाई केली.