पुणे- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक 1 ने कोंढव्यातुन 202 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थासह एक जण ताब्यात घेतला. या अंमली पदार्थाची किंमत 40,40,000 रुपये एवढी असून याबरोबर एक गावठी कट्टा हि पोलिसांनी हस्तगत केला .समीर शरीफ शेख वय 22 वर्षे रा. फलॅट नं *. 604, 6 वा मजला , सय्यद काझी हाईटस, भाग्योदय* नगर गल्ली नं . 30,मक्का मश्जिद जवळ कोंढवा याच्या घरात छापा घालून त्याला अटक करत त्याच्या घरातून हे अंमली पदार्थ आणि शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ वरिष्ठांनी दिलेले आदेश व सुचना नुसार सहा. पो. आयुक्त,गुन्हे 1 श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक 01 कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम व स्टाफ ने दिनांक 06/09/2024 रोजी कोंढवा पो स्टे चे हद्दीत स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना समीर शरीफ शेख रा. सय्यद काझी हाईटस कोंढवा, भाग्योदयनगर लेन नं. 30,कोंढवा पुणे. हा त्याचे राहते घरातुन एम.डी.(मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी त्याबाबत वरिष्ठांना कळविले असता, वरिष्ठांनी त्याबाबत कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक उल्हास कदम व स्टाफ यांनी सय्यद काझी हाईटस भाग्योदयनगर,गल्ली नं. 30,कोंढवा पुणे येथे सापळा रचुन समीर शरीफ शेख वय 22 वर्षे रा. फलॅट नं *. 604, 6 वा मजला , सय्यद काझी हाईटस, भाग्योदय* नगर गल्ली नं . 30,मक्का मश्जिद जवळ कोंढवा पुणे. यास ताब्यात घेवुन त्यांची घर झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एकुण किं. रु. 42,26,500/- चा ऐवज त्यामध्ये किं.रु. 40,40,000/- चा 202 ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ, किं.रु.25,000/- चा एक स्टिलचा गावठी कट्टा, 80,000/- रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल, असा असलेला ऐवज व एम.डी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला असल्याने नमूद आरोपी यांचे विरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालु आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त,गुन्हे शैलेश बलकवडे, पो उप आयुक्त, गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे 01 पुणे शहर गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक,1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, उत्तम संदेश काकडे, दयानंद तेलंगे पाटील, विपुल गायकवाड, योगेश मोहिते, रेहाना शेख व कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी केली.