पुणे, दि. ६: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्याकरीता आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी https://www.mahashabari.in या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत २०२४-२०२५ करीता पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांकरिता कर्जयोजना राबविण्यासाठी योजनानिहाय लक्षांक प्राप्त झालेले आहेत.
महिला सबलीकरण योजनेकरीता २ लाख रुपये कर्जाचे २२ लक्षांक, कृषी आणि संलग्न व्यवसायासाठी ५ लाख रुपये कर्ज- ६, हॉटेल ढाबा व्यवसायासाठी ५ लाख रुपये- लक्षांक ६, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्टसाठी ५ लाख रुपये कर्ज- लक्षांक ६, वाहन व्यवसायासाठी १० लाख रुपये- लक्षांक ५, वाहन व्यवसाय १० लाखाहून अधिक व १५ लाख रुपयांपर्यत – लक्षांक ८, लघु उद्योग व्यवसायासाठी ३ लाख रुपये कर्ज- लक्षांक ७, ऑटो रिक्षा,मालवाहू रिक्षा ३ लाख रुपये- लक्षांक ६, आणि स्वयंसहायता बचतगट ७ असा लक्षांक प्राप्त झालेला आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या जुन्नर शाखा कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.