पुणे, दि.६: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनी मीटर तपासणीचे काम ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून संबंधितांनी रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नंबर ३ किंवा इऑन आयटी पार्कजवळ, खराडी पोलीस चौकीसमोर सकाळी १० वा. नवीन ट्रॅकच्या स्टॉर्ट पॉईंटला ऑटोरिक्षासह उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.