नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची वचनपूर्ती!
पुणे: गणेशोत्सव आता उद्या सुरू होत आहे.पुणे शहरात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात, यावेळी अनेकदा दागिने, पाकिटे, वस्तू अशा अनेक गोष्टींच्या चोऱ्या होत असतात, या काळात कोणतेही गुन्हे घडू नयेत त्यावर आळा बसावा या कारणास्तव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, असा पोलिसांचा आग्रह धरला होता. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला असून, मतदारसंघातील गणेश मंडळांच्या मागणीनुसार, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे मंडळांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राला सण आणि उत्सवाची एक वेगळीच परंपरा आहे. महाराष्ट्रात प्रत्येक सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सव हा त्यापैकीच एक असून, गणेश भक्तांसाठी गणेशोत्सवाचे हे दहा दिवस मोठ्या जल्लोषाचे असतात. सर्वत्र बाप्पाचे देखणे रूप पाहायला मिळते. घरात आणि अवतीभोवती वातावरण प्रसन्न होऊन जातं. त्यामुळे हा उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील प्रयत्नशील असतात.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरुड विधानसभा मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण-सूस मधील मंडळांची संयुक्त बैठक २४ ऑगस्ट रोजी संपन्न झाली होती. या बैठकीत कोणतेही गुन्हे घडू नयेत त्यावर आळा बसावा या कारणास्तव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, असा पोलिसांचा आग्रह धरला होता. त्यामुळे उत्सव काळातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, त्यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही दिली होती.
त्यानुसार, बाणेर-बालेवाडी भागातील अनेक गणेश मंडळांनी उत्सवाच्या निमित्ताने मंडळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले असून, याबद्दल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.