पुणे प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिकेच्या वतीने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या एकूण 15 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 15 पैकी 10 शिक्षक पुणे मनपा प्राथमिक शाळेतील तर 5 शिक्षक खाजगी प्राथमिक शाळेतील आहेत.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण 90 प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने शिक्षण विभाग (प्राथमिक) कडे आले होते. शासन निकषाप्रमाणे निवड समितीमार्फत कागदपत्र पडताळणी, मुलाखत व वर्गभेटीद्वारे आलेल्या प्रस्तावामधून आदर्श शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच टॅब देवून गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे या ठिकाणी शेखर गायकवाड,अतिरिक्त महासंचालक यशदा यांचे शुभहस्ते आणि डॉ. राजेंद्र भोसले, प्रशासक तथा आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण 90 प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने शिक्षण विभागाकडे आले होते. शासन निकषाप्रमाणे निवड समितीमार्फत कागदपत्रे पडताळणी, मुलाखत व वर्गभेटीद्वारे आलेल्या प्रस्तावामधून आदर्श शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली आहे.अशी माहिती शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे मनपा उपआयुक्त आशा राऊत यांनी दिली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मनपा प्राथमिकच्या शिक्षकांची नावे खालीलप्रमाणे,
1) सुनिता धर्मा गायकवाड
मनपा शाळा क्र. 181 मुलांची, खराडी, पुणे 14
2) सुलताना अन्सार मण्यार
सावित्रीबाई फुले, विदयानिकेतन ४, गाडीतळ, हडपसर, पुणे 28
3) चेता बाळकृष्ण गोडसे
मनपा शाळा वाघोली शाळा क्र.। वाघोली, पुणे- 412207
4) ललिता बाबासाहेब चौरे
मनपा शाळा क्र. 87 मुलींची, गाडीतळ, हडपसर, पुणे 28
5) बलभीम शिवाजी बोदगे
मनपा शाळा क्र. 12 मुलांची काळेबोराटे नगर, पुणे
6) निशिगंधा विजय आवारी
मनपा शाळा क्र. 19 मुलींची खराडी, पुणे 14
7) किरण कृष्णकांत गोफणे
मनपा शाळा क्र. 87 मुलींची, गाडीतळ, हडपसर, पुणे 28
8) सोनाली सोमनाथ शिवले
मनपा शाळा क्र. 99 मुलींची वडगावशेरी, पुणे 14
9) गणेश भगवान राऊत
मनपा शाळा क्रमांक 171 मुलांची काळे बोराटे नगर, पुणे
10) शर्मिला समीर गायकवाड
मनपा शाळा क्र. 82 मुलींची कोंढवा, पुणे.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी खाजगी प्राथमिक शिक्षकांची नावे खालीलप्रमाणे,
1) ज्योत्स्ना बाळू पवार
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा, कात्रज पुणे 411046
2) मोनिका गणेश नेवासकर
रँग्लर पु परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे 30
3) मधुरा पांडुरंग चौधरी
सारथी प्राथमिक विद्यालय, खराडी पुणे 14
4) प्रिया गणेश इंदुलकर
नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ, पुणे 30
5) संजय आबासाहेब दरेकर
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, ईऑन ग्यानांकूर स्कूल, खराडी, पुणे 14