मुंबई – पॅडलपार्क इंडिया ही भारतात पॅडल खेळासाठी समर्पित असलेली सर्वसमावेशक यंत्रणा आणि आघाडीच्या कंपनीला जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स अँड इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे (आयआयएस) संस्थापक श्री. पार्थ जिंदाल यांच्यातर्फे आज नवे फंडिंग मिळाले आहे.
पॅडल हा रॅकेटने खेळला जाणारा क्रीडाप्रकार असून तो मुळचा मेक्सिकोचा आहे. गेल्या काही वर्षांत या खेळाने युरोपमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली असून, जगभरातही तो लोकप्रिय होत आहे. या खेळाच्या वेगवान विकासाचा त्याच्या कोर्ट्सच्या वाढत्या संख्येवरून अंदाज लावता येईल. या कोर्ट्सची संख्या २०१६ मधील १०,००० वरून २०२४ मध्ये ५०,००० वर गेली आहे व २०२६ पर्यंत ती ६०,००० पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. गेल्या एका वर्षातच जगभरात २५०० पॅडल क्लब्ज सुरू केले गेले.
जागतिक पॅडल उद्योगाचे सध्याचे बाजारमूल्य २.२ अब्ज डॉलर्स असून त्यात ११० देशांतील २५ दशलक्ष खेळाडूंचा समावेश आहे. हा उद्योग वार्षिक पातळीवर २२ टक्के दराने वाढून २०२६ पर्यंत ६.६ अब्ज डॉलर्सवर जाईल असा अंदाज आहे. या विकासामागच्या प्रमुख घटकांमध्ये खेळातील वाढता रस, नवं काहीतरी आजमावण्याची इच्छा, प्रसिद्ध व्यक्तींद्वारे केला जाणारा प्रचार आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वाढते प्रमाण यांचा समावेश आहे. भारतातील लोकसंख्येपैकी २३ टक्के जण या खेळात सक्रियपणे भाग घेत असून २३२ दशलक्ष पॅडल क्रीडा प्रेमींसह देशात बाजारपेठेच्या वृद्धीची चांगली संधी तयार झाली आहे.
पॅडलपार्कमधील या गुंतवणुकीविषयी जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स अँड आयआयएसचे संस्थापक पार्थ जिंदाल म्हणाले, ‘पॅडलपार्क पॅडल खेळासाठी यंत्रणा तयार करत असून त्यामध्ये विद्यार्थी शिक्षक शिक्षण उपक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यापासून दमदार टुर्नामेंट फ्रेमवर्क तयार करण्यापर्यंतच्या विविध बाबींचा समावेश आहे. नाविन्य आणि कम्युनिटी तयार करत त्याद्वारे जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्याचे संस्थापकांचे व्हिजन आमच्या भारताला क्रीडाप्रधान देश बनवण्याच्या व्हिजनशी सुसंगत आहे. पॅडल हा क्रीडाप्रकार जगभरात वेगाने लोकप्रिय होत आहे आणि पॅडलपार्क टीमसह काम करून या खेळाची भारतातील लोकप्रियता वाढवण्यासाठी मी उत्सुक आहे.’
या गुंतवणुकीविषयी पॅडलपार्कचे सह- संस्थापक रोनक डाफ्टरी म्हणाले, ‘पार्थ आणि त्यांच्या टीमचे सहकार्य मिळाल्याबद्दल आणि त्यांच्यासह भारताला पॅडल कोर्ट्स निर्मिती व वितरणातील सर्वात मोठा देश बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतात हा क्रीडाप्रकार प्रचलित करण्यासाठी पार्थ हे योग्य व्यक्ती आहेत असा विश्वास आम्हाला वाटतो.’
२०२० मध्ये स्थापन झालेल्या सेल्फ- फंडेड पॅडलपार्कचे मुख्यालय मुंबईत आहे. कंपनी भारत आणि आशियात पॅडल पायाभूत सुविधांच्या विकासात आघाडीवर असून त्यासाठी स्काय पॅडल या आघाडीच्या स्पॅनिश कंपनीशी धोरणात्मक करार करण्यात आला आहे. कंपनी भारतीय पॅडल अकॅडमीचे कामकाज हाताळत असून त्यांच्याद्वारे भारतातील विविध स्तरावरील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उतरण्याची संधी दिली जाते.
पॅडलपार्कचे सह- संस्थापक रोनक डाफ्टरी, जिगर दोशी, निखिल सचदेव आणि प्रतीक दोशी यांच्या रूपाने भारताला क्रीडा पायाभूत सुविधा निर्मितीचा दीर्घ अनुभव लाभला आहे. भारतात खेळाचा प्रसार आणि अवलंब वाढण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
सध्या पॅडलपार्क इंडियाद्वारे मुंबईत ११ पॅडल कोर्ट्स चालवली जातात आणि कंपनीने विविध स्पोर्ट्स क्लब, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि कॉर्पोरट कंपन्यांसाठी २२ कोर्ट्स उभारली आहेत. कंपनीच्या नामांकित ग्राहकांमध्ये विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब, एनएससीआय क्लब, जेएसडब्ल्यू इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट, मॅरियट स्वीट्स तसेच इतरांचा समावेश आहे. विकासावर भर देत पॅडलपार्कने पुढील काही वर्षांत देशभरात १०० पॅडल क्लब्ज स्थापन करम्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यात त्यांच्या मालकीच्या तसेच फ्रँचाईझीद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेंटर्सचा समावेश असेल.
नवीन फंडिंग पायाभूत सुविधा विस्तारण्यासाठी आणि अकॅडमीच्या सुविधा आणि कार्यक्रम वाढवण्यासाठी केला जाणार आहे.
पॅडलपार्क इंडिया पुढील तीन महिन्यांत ४० पॅडल कोर्ट्स वितरित करणार असून पुढील ६० दिवसांत १५ पॅडल सेंटर्स/क्लब्ज सुरू करेल व पुढच्या महिन्यापासून २५० लोकांना प्रशिक्षित करेल.
पॅडलपार्क इंडियाद्वारे भारतात आजपर्यंतची सर्वात मोठी पॅडल स्पर्धा २३ ऑगस्टपासून आयोजित केली जाणार असून त्यात ९० टीम्स आणि नामवंत प्रायोजक सहभागी होणार आहेत.