Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे वारकरी संमेलनाचे रविवारी (ता. २५) आयोजन

Date:

राज्यप्रमुख हभप आबा महाराज मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

संमेलनाध्यक्षपदी हभप बापूसाहेब देहूकर, स्वागताध्यक्षपदी जयंत पाटील

उद्घाटनप्रसंगी युगेंद्र पवार, तर समारोपावेळी शरद पवार यांची उपस्थिती

पुणे, ता. २३: राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पहिल्या वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (ता. २५) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत शुभारंभ लॉन्स, डीपी रोड, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे होणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल (आबा) महाराज मोरे, राज्य उपाध्यक्ष हभप मुबारक महाराज शेख, युवा वारकरी विभाग संपर्कप्रमुख हभप सुरज महाराज लवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आबा महाराज मोरे म्हणाले, “वारकरी संमेलनाध्यक्षपदी संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, तर स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आहेत. संमेलनाचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता हभप भारत महाराज जाधव, हभप राजाभाऊ चोपदार, हभप राजेंद्र येप्रे महाराज व युवा नेते युगेंद्र श्रीनिवास पवार यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या वारकरी संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. संमेलनात दुपारी ३.३० वाजता ‘धर्म व राजकारण’ या विषयावर जयंत पाटील यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ संपादक संजय आवटे घेणार आहेत.”

“उद्घाटनानंतर ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान’ या विषयावर आयोजित परिसंवादात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद, हभप गणेश महाराज फरताळे, हभप राजेंद्र येप्रे महाराज वक्ते म्हणून सहभागी होतील. परिसंवादाचे अध्यक्षस्थान हभप बालाजी महाराज जाधव भूषविणार आहेत. “दुपारच्या सत्रात हभप ज्ञानेश्वर महाराज रक्षक यांच्या अध्यक्षेतेखालील परिसंवादात हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, हभप गणेश महाराज फरताळे, हभप ज्योतीताई जाधव सहभागी होतील. दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य प्रदान व पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे,” असेही आबा महाराज मोरे यांनी नमूद केले.

संमेलनात हभप भगवतीताई बाबामहाराज सातारकर, भारत महाराज घोगरे, तुळशीराम महाराज सरकटे, जलाल महाराज सय्यद, महादेव महाराज बोराडे यांच्यासह वारकरी संप्रदायातील इतर अनेक महाराज, संत साहित्याचे अभ्यासक, तसेच खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, अमर काळे, भास्कर भगरे, सुरेश म्हात्रे, बजरंग सोनवणे, निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, सुमन पाटील, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, मानसिंग नाईक, लिज्जत पापडचे सुरेश कोते, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

विवेकाची, एकात्मतेची पेरणी व्हावी

संयोजन समितीमध्ये हभप शामसुंदर सोन्नर महाराज, राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी खटकाळे, डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, बिल्डर सेलचे अध्यक्ष मिलिंद पाटील, ज्ञानोबा-तुकारामचे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांचा समावेश आहे. वारकरी संप्रदाय वैश्विक विचारांचा, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश देतो. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांनी हाच वारसा पुढे नेत आपल्याला प्रेरणा दिली. वारकरी संप्रदायाचा हाच विचार घेऊन समाजात विवेकाची, सर्व जाती-धर्माच्या एकात्मतेची पेरणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीची स्थापना झाली आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादाने, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आबा महाराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही आध्यात्मिक व वारकरी आघाडी राज्यभर कार्यरत असल्याचे हभप मुबारक महाराज शेख म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केसरीवाड्यात अभिवादन करुन गौरवशाली महाराष्ट्र मंगल कलश रथयात्रा पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ…

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे महाराष्ट्र...

वंचित, गुणवंत विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी आर्थिक पाठबळ

पुणे : ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी...

ऐतिहासिक चित्रपटांमुळे संस्कारक्षम पिढी घडेल : मुरलीधर मोहोळ

पुणे : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा...

शहर पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी, पोलीस हवालदार यांना महाराष्ट्र दिनानिमित्त महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

पुणे- महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ...