पुणे – पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी उत्कृष्ट कारभार पाहिलेले आणि कार्यकाळ पूर्ण होण्या आधीच बदली करण्यात आलेले विकास ढाकणे यांची आता उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे,नुकताच ढाकणे यांनी येथील आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पुण्यातून त्यांची भारतीय रेल्वे सुरक्षा सेवा विभागात बदली करण्यात आली होती.पुण्यात त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा होत असताना कार्यकाळ पूर्ण होण्या आधी त्यांची झालेली बदली चर्चेचा विषय ठरली होती आणि त्यांना पुन्हा पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नेमा अशी मागणीही होऊ लागली होती.
पण गेल्या २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी त्यांच्या उल्हासनगर येथील महालिका आयुक्त पदावर नेमणुकीचे आदेश पारित केले.
पुण्यात कात्रज कोंढवा रोड चा २०० कोटीचा निधी मिळवून भूसंपादनाचा रखडलेला विषय त्यांनी मार्गी लावला होता या शिवाय खडकी,गणेश खिंड रोड आणि अन्य रस्त्यांच्या कामांना गती देऊन कित्येक कामे वेगाने पूर्ण करून आपल्या कार्यशैलीचा हातखंडा लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवला होता.