मनिषा नाईक यांचा पत्ता कापून त्यांच्या स्पर्धकांना दिली हवी ती खाती…
पुणे – महापालिका आयुक्तांनी सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल केले आहेत. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले नुकतेच याबाबत आदेश जारी केले आहेत.ज्यात अतिरिक्त आयुक्तांनी महत्वाची भूमिका बजावली आहे . शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेविषयी तक्रारी आल्यानंतर हे कामकाज या वरिष्ठांच्या विषयी आलेल्या तक्रारींची शहानिशा करणारे त्यांचे ज्युनिअर सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे यांच्याकडे देण्यात आले होते, ही दोन्ही खाती त्यांच्याकडेच देण्यात आले आहे पूर्वी. हे कामकाज डॉ मनीषा नाईक पाहत होत्या. आणि त्यांच्या वीषयी च्या तक्रारीची चौकशी त्यांना ज्युनियर असलेले डॉ वावरे यांच्या कडे अतिरिक्त आयुक्तांनी सोपविली होती, आता ती खाती च त्यांना देऊन टाकण्यात आली आहे. याशिवाय डॉ वावरे यांच्याकडे औषध भांडार, महापालिका रुग्णालयाचे सुधारणा व आधुनिकीकरण, आरोग्य प्रकल्प, परिमंडळ १ सनियंत्रण व पर्यवेक्षण अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उपआरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांना फक्त जन्म मृत्यू, विवाह नोंदणी आणि स्मशानभूमी, दफनभूमी अद्यावतीकरण ची जबाबदारी होती. ती कमी करत आता त्यांना PCPNDT, MTP act, मेडिकल कॉलेज व्यवस्थापन, मेडिकल यूनिट आणि आरोग्य विभागाकडील सामान्य प्रशासन ची जबाबदारी देण्यात आली आहे. PCPNDT आणि MTP ची जबाबदारी पूर्वी डॉ सूर्यकांत देवकर यांच्याकडे होती. तसेच १ ते ३ लाख पर्यंतची वैद्यकीय बिलांची देयके मान्य करण्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.
डॉ वैशाली जाधव यांच्याकडील NUHM ची जबाबदारी डॉ मनीषा नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच जन्म मृत्यू, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, परिमंडळ २ सनियंत्रण ची जबाबदारी डॉ नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.
डॉ वैशाली जाधव यांच्याकडे साथरोग नियंत्रण कार्यक्रम, DPDC, महापौर निधी, एनसीडी, परिमंडळ ४ ची जबाबदारी देण्यात आली आहे.सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांच्याकडील पहिल्या सगळ्याच जबाबदाऱ्या कमी करत पूर्णपणे नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. डॉ देवकर यांच्याकडे आता जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट, नर्सिंग होम रजिस्ट्रेशन, विकेंद्रित परवाना विभाग, AIDS, परिमंडळ ३ च्या सनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.डॉ राजेश दिघे यांच्याकडील कामाचा आवाका वाढवण्यात आला आहे. डॉ दिघे यांच्याकडे फक्त राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम ची जबाबदारी होती. ती तशीच कायम ठेवत कीटक प्रतिबंधक विभाग, CSR, स्मशानभूमी, दफनभूमी संबंधित कामकाज, बोगस डॉक्टर शोध मोहीम, परिमंडळ ५ चे सनियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.