बदलापूर- येथील शाळेतील घटनेमागे शाळेने केलेला उशीर हे सर्वात मोठे गोंधळाचे कारण असल्याचे राज्य बाल हक्क आयोगाने म्हटले आहे. बदनापूर येथील घटने संदर्भात राज्य बाल हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली असून या संदर्भात त्यांनी कडक ताशेरे ओढले आहेत. अकरा तासानंतर या प्रकरणाची एफआयआर दाखल झाली. हाच खरा प्रॉब्लेम असल्याचे बाल हक्क आयोगाने म्हटले आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा होता, असे देखील बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष शहा यांनी म्हटले आहे.या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा होता, असे देखील खुशी शहा यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपी हा पंधरा दिवस शाळेत होता. त्याला सर्व ठिकाणी जाण्याचा अक्सेस होता. त्यामुळे आम्हाला आणखी भीती वाटत असल्याचे सुसिबेन शहा यांनी म्हटले आहे.
सदरील आरोपी हा मनोरुग्ण नाही, असे देखील शहा यांनी स्पष्ट केले. मुलींच्या बाथरूम मध्ये जाण्याची पुरुषाला परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तो व्यक्ती पंधरा दिवस शाळेत वावरत होता. जोपर्यंत मुले शाळेमध्ये आहेत, जो पर्यंत मुलांनी शाळेचा युनिफॉर्म घातलेला आहे. तोपर्यंत जबाबदारी शाळेचीच आहे, असे देखील त्यांनी विचारले. कंत्राटी कर्मचारी घेतला असेल तर त्याचे आय कार्ड कुठे? त्याचा कंत्राट कुठे? त्याला मुलींच्या बाथरूमचा ॲक्सेस कसा दिला गेला? असे अनेक प्रश्न आयोगाने उपस्थित केला आहे.
प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडयला हवी होती. प्रत्येक शाळेने, पालकाने, सामाजिक कार्यकर्त्यांनी, शासनाने सर्वांनी आप – आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली नाही, तर अशा घटनांना आळा बसणार नाही. असे देखील शहा यांनी म्हटले आहे. हे सर्व भीतीदायक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.