बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणारच हवे तर जेल मध्ये टाका किंवा फाशी द्या …..सुप्रिया सुळे
पुणे- बदलापूर च्या घटनेवरून सुप्रिया सुळे आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला आहे. आंदोल्कानावर गुन्हे दाखल करत त्यांची धरपकड सरकार करतेय अशी बातमी आज सकाळी येथे येताच त्या आणखीच संतापल्यात. यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या गृहमंत्र्यांना हाकला, यांच्या काळात गुन्हेगार निर्ढावलेत महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय अशी भूमिका घेत आज निदर्शने केली .
बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यासाठी व अत्याचारी नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी खा.सौ. सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
या प्रकरणात पोलिस यंत्रणेने गुन्हा नोंदवण्यात केलेली अक्षम्य दिरंगाई, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असलेल्या संस्था चालकांची संशयास्पद भूमिका याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरकारला जाब विचारण्यात आला.
खा.सौ. सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, अजित पवार राजीनामा द्या, महिला आयोग हाय हाय, महिलांना सुरक्षा द्या नराधमांना फाशी द्या अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी संपूर्ण डेक्कन परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनास आदरणीय खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात पुणे शहरातील श्री. प्रशांत जगताप, स्वाती पोकळे, भारती शेवाळे, किशोर कांबळे,आशाताई साने, वेशाली थोपटे,मनाली भिलारे, पायल चव्हाण, अप्पा जाधव, ऋतुजा देशमुख,आसिफ शेख, राजश्री पाटील, पोपट खेडेकर, रोहन पायगुडे, मंगलताई पवार, रमीज सय्यद, दिलशाद शेख, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माझे पोलिस संरक्षण काढून ते जनतेला द्या –
राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येतोय. त्यातच राजकीय नेत्यांना पोलिस संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे माझे पोलिस संरक्षण काढून ते जनतेच्या सेवेत द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अशी विनंती केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात प्रंचड गुन्हेगारी वाढली आहे, असे केंद्र सरकारचा डेटा सांगत आहे. महिला अत्याचाराचा विषय खूप गंभीर होत आहे. जनता रस्त्यावर आल्यानंतर सरकारला जाग आली. शक्ती कायदा जो मविआच्या काळात आणला होता त्यांचे या सरकारने काय केले असा सवाल सुळेंनी उपस्थित केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलिस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.
दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.
यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलिस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती.
फडणवीसांनी राजीनामा द्यावा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, असे कृत्य करणाऱ्या लोकांना सरकारचा धाक कसा नाही. केवळ ईडी आणि सीबीआयचा धाक आहे. या नराधमांच्या विरोधात सरकार काही करत नाही. गेल्या आठवड्यात आशा 7 केस समोर आल्या असे सुळेंनी म्हटले आहे. गृहमंत्री महारार्ष्टात पार्ट टाइम करतात, ते पूर्णवेळ दिल्लीत असतात, असे म्हणत फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. फडणवीसांनी नैतिकतेच्या आधारावर संपूर्ण जबाबदारी घेत राजीनामा द्यायला हवा.