जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा पुन्हा लाठीमार; आंदोलकांना रेल्वेरुळांवरुन हटवले, जमावाची दगडफेक
मुंबई लगतच्या बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत. त्यांनी बदलापूर बंदची हाकही दिली आहे. तसेच रेल्वे रोकोही केला आहे. यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.अखेर पोलिसांनी गेल्या आठ ते दहा तासांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करून हटवण्याचा प्रयत्न केला . त्यानंतर देखील काही आंदोलक पोलिसांवर दगडफेक करत असल्याचे पाहायला मिळाले.
मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीने आंदोलकांची पाऊण तास मनधरणी केली. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आरोपीला शिक्षा होणारच आहे, जी लोकांची भावना आहे. तीच भावना आमची देखील आहे. परंतु रेल्वे रोखून चालणार नाही. पोलिसांनी दिरंगाई केली त्यांना निलंबित केलेले आहे, असेही महाजन यांनी आंदोलकांना सांगितले. त्यानंतर देखील आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.अखेर महाजन यांची मनधरणी उपयोगी पडली नाही, अखेर त्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला .
विद्या चव्हाण-बदलापूरच्या शाळेत जी अतिशय वाईट घटना घडलेली आहे. शाळेबरोबरच पोलिसांनी देखील हे प्रकरण दबडण्याचे काम केले गेले, त्यादृष्टीने गृहमंत्र्यांकडून कारवाई होण्याची गरज आहे. ती होताना दिसत नाही. शिपाई पोस्टवर लेडीज असल्या पाहिजे. मोदी सरकारने आता फाशीच्या शिक्षेची तरतूद झालीच पाहिजे. पोलिस काय फक्त मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी आहेत का?, या प्रकरणातील जे पोलिस व शाळेतील कर्मचारी आहेत त्यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली.