एक सर्वसमावेशक मोबाइल ॲप्लिकेशन
· व्यापाऱ्यांना या मोबाईल ॲपद्वारे पेमेंट स्वीकारणे, व्यवहारांचा वृत्तांत पाहणे आणि सेवेसाठी विनंती सादर करणे शक्य;
· ओम्नी चॅनेल पेमेंटची सुविधा उपलब्ध;
· पेमेंटची प्रक्रिया आणि सेवेबाबत विनंती या गोष्टी मोबाइल ॲपद्वारे सुरळीत;
· ॲपच्या ऑल-इन-वन कार्यक्षमतेमुळे कमी खर्चात मिळतात विविध उपाय.
मुंबई, २० ऑगस्ट २०२४ : भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने आज व्हिसा आणि मिंटओक यांच्या भागीदारीत व्यापाऱ्यांसाठी ‘निओ फॉर मर्चंट्स’ नावाचे ॲप्लिकेशन सादर केले. अत्याधुनिक बँकिंग सोल्युशन्स उपलब्ध करून व्यवसायांना सक्षम बनवण्याच्या ॲक्सिस बँकेच्या कटिबद्धतेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यूजर-फ्रेंडली इंटरफेस, पेमेंट स्वीकृतीचे अनेकोपयोगी पर्याय आणि व्यवसायासंबंधी महत्त्वाची माहिती मिळण्याची सोय अशी वैशिष्ट्ये असलेले हे ‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲप भारतभरातील व्यापाऱ्यांसाठी पेमेंटसंबंधीच्या सुविधा पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे.
‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲपच्या माध्यमातून व्यापारी पेमेंट स्वीकारण्यास, व्यवहारांचे वृत्तांत पाहण्यास आणि सेवेसंबंधीच्या विनंती सादर करण्यास सक्षम होतात. त्यामुळे त्यांना या कामांसाठी रिलेशनशिप मॅनेजरवर अवलंबून राहण्याची गरज राहात होते. या ॲप्लिकेशनच्या ऑल-इन-वन कार्यक्षमतेमुळे व्यापाऱ्यांना कमी खर्चात अनेक उपाय मिळतात. तसेच ओम्नी चॅनेल स्वरुपात पेमेंटचे अनुभव आणि व्यवहार व सेवा अहवाल यांसारख्या सर्व व्यापारी गरजांसाठी हे ॲप ‘वन-स्टॉप सोल्युशन’ ऑफर करते. व्यवसायात अधिकाधिक सोयी निर्माण करणारे हे ॲप डिजिटलायझेशनच्या वाढत्या ट्रेंडशी अगदी सुसंगत आहे.
व्यापाऱ्यांच्या वाढत्या गरजा आणि त्यांच्यापुढील आव्हाने लक्षात घेऊन, ॲक्सिस बँकेचे ‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲप अनेक फायदे देते:
· सुविधा : कार्ड, एसएमएस पे आणि यूपीआय यांद्वारे व्यापारी कधीही पेमेंट स्वीकारू शकतात. त्यामुळे त्यांना व त्यांच्या ग्राहकांना उत्तम अनुभव आणि समाधान मिळते.
· कार्यक्षमता : या मोबाइल ॲपद्वारे पेमेंटची प्रक्रिया आणि सेवेसाठीची विनंती सादर करणे या क्रिया सुलभतेने होतात. त्यामुळे व्यापारी व कर्मचारी या दोघांचाही वेळ वाचू शकतो व उत्पादकता वाढते.
· डेटासंबंधीची माहिती : या ॲप्लिकेशनद्वारे व्यवहार आणि सेटलमेंट यांचे वृत्तांत व्यापाऱ्यांना लगेच मिळतात व त्यातून त्यांना तातडीची माहिती उपलब्ध होते.
· यूजर–फ्रेंडली ॲप : पेमेंट आणि सेवा क्षमता यांमुळे या ॲपचे मूल्य वाढून त्यातून सर्व कामे सुरळीत होतात, उत्कृष्ट अनुभव मिळतो आणि व्यवसाय वाढीस चालना मिळते.
ॲक्सिस बॅंकेने व्हिसा आणि मिंटओक यांच्याशी केलेल्या भागीदारीमुळे बॅंकेच्या व्यापाऱ्यांसंबंधीच्या सेवांचा पोर्टफोलिओ बळकट झाला आहे. डिजिटल पेमेंटमध्ये व्हिसा दिग्गज आहे, तर ‘मिंटओक’चे खास व्यापाऱ्यांसाठीचे सास सोल्यूशन भारतीय लघुउद्योगांसाठी आर्थिक समावेशकता वाढवते. व्हिसा आणि मिंटओक यांच्या सहकार्यामुळे बॅंकेला देशभरातील लघु व मध्यम उद्योगांसोबत चांगले संबंध निर्माण करता येतील, असलेले संबंध दृढ करता येतील आणि या उद्योगांच्या वाढीला चालना देण्यात सहाय्य करता येईल.
‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲप्लिकेशन सादर करताना ‘ॲक्सिस बँकेचे प्रेसिडेंट & हेड – कार्ड्स आणि पेमेंट्स विभागाचे प्रमुख संजीव मोघे म्हणाले, “व्यापारी समुदायासाठी सतत सर्वसमावेशक डिजिटल सोल्युशन्स आणण्याकरीता आम्ही प्रयत्नशील असतो. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायातील खर्च कमी करता यावेत आणि डिजिटल पेमेंट्स परवडणाऱ्या दरात स्वीकारता यावेत, हा आमचा उद्देश आहे. ‘निओ फॉर मर्चंट्स’ हे व्यापारी समुदायाच्या सर्व व्यावसायिक गरजांसाठीचे वन-स्टॉप सोल्युशन आहे. त्यांचा व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी, त्यांना अधिक सुविधा मिळण्यासाठी आणि एक मजबूत डिजिटल इकोसिस्टम तयार करून त्यांना मदत करण्यासाठी हे ॲप्लिकेशन आम्हाला उत्तम संधी मिळवून देते.”
ॲक्सिस बँकेसोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना ‘मिंटओक’चे को–फाऊंडर & सीईओ रमण खंडुजा म्हणाले, “व्यवसायांमध्ये अधिकाधिक डिजिटायझेशन येत असताना, ॲक्सिस बँकेसोबतच्या सहकार्यातून आजच्या एसएमईना उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सोल्युशन्स देणे आम्हाला सहज शक्य होईल. बॅंकेवर असणारा ग्राहकांचा विश्वास आणि त्यांचे सर्व ठिकाणी असलेले वितरण यांच्या जोडीला आमचे तांत्रिक कौशल्य असल्याने, ‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲप हे पेमेंट, वित्तसाह्य आणि व्यवहार यांसंबंधीच्या गरजा निश्चितच पूर्ण करेल.”
“निओ फॉर मर्चंट्स सादर करण्यासाठी ॲक्सिस बँक आणि मिंटओक यांच्याशी सहकार्य करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे एक परिवर्तनशील मोबाइल ॲप आहे. व्यापारी आणि लहान व्यवसायांना डिजिटल युगात भरभराटीस आणून स्पर्धेत उतरण्यास ते मदत करते. सुविधा, कार्यक्षमता आणि वाढीसाठी मौल्यवान माहिती या बाबी उपलब्ध करून उद्योगशील, उत्साही अशा भारतीय व्यापाऱ्यांच्या आकांक्षांना समर्थन देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ‘व्हिसा’च्या सामर्थ्याने, आम्ही आमच्या ग्राहकांना आणि एकूणच वाणिज्य क्षेत्राच्या भवितव्याला आकार देतो आणि सर्वत्र सुरक्षित व अखंड पेमेंटचा अनुभव मिळवून देतो,” असे प्रतिपादन ‘व्हिसा’चे भारत व दक्षिण आशिया क्षेत्राचे व्यापारी विक्री विभागाचे प्रमुख ऋषी छाबरा यांनी केले.
ॲक्सिस बँक ही देशातील व्यापारी-संपादन व्यवसायातील सर्वात मोठी संस्था आहे. जून २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार, ‘पीओएस टर्मिनल’च्या क्षेत्रात तिचा बाजारपेठेत २० टक्के हिस्सा होता. तिने आतापर्यंत देशभरात १८.६७ लाख इतके टर्मिनल्स बसविले आहेत आणि मेट्रो शहरे, इतर शहरे आणि ग्रामीण भागात सर्व श्रेणीतील व्यापाऱ्यांना सेवा पुरविली आहे. बँकेने गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत (जून २३ ते जून २४) बाजारपेठेत ४३ टक्के इतका वाढीव हिस्सा मिळवला आहे.
‘निओ फॉर मर्चंट्स’विषयी अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंक पाहा : https://www.axisbank.com/business-banking/in-store-payment-acceptance
व्यापाऱ्यांसाठीची वैशिष्ट्ये आणि फायदे पाहण्यासाठी; कृपया पुढील लिंकवर क्लिक करा : https://youtu.be/0c5UBbKvaHM?feature=shared