श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने आयोजन ; श्री महालक्ष्मी सह इतरही मूर्ती पाळण्यामध्ये विराजमान
पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात श्रावण महिन्यातील झुला उत्सवाच्या निमित्ताने फुलांची आकर्षक सजावट व दीपप्रज्वलनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्री विष्णू यांच्या मूर्ती पाळण्यामध्ये विराजमान झाल्यानंतर विविध प्रकारची भजने व श्री महालक्ष्मी मातेचा जयघोष करीत झुला उत्सव थाटात साजरा केला.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने मंदिरामध्ये झुला उत्सव आयोजित करण्यात आला होता. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव मंदिरात झाला. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध फुले, भाज्या, फळे, राखी वापरून दररोज वेगवेगळ्या प्रकारे झुला सजवण्यात येतो. मंदिरात हजारो भाविक यावेळी दर्शनासाठी येत असतात.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यात झुला उत्सव साजरा केला जातो. यामध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्री विष्णू यांच्या मूर्ती गाभा-यातून आणून सभामंडपात पाळण्यामध्ये ठेवल्या जातात. उत्सवाच्या निमित्ताने सभामंडप आणि मंदिर परिसरात विविध फुले व इतर गोष्टी वापरून सजावट करण्यात येते. तसेच दररोजची आरती व भजनाचे कार्यक्रम होतात. यंदा भाविकांनी मोठया संख्येने उत्सवानिमित्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.