आळंदी : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील आळंदीत वारकरी शिक्षणआणि निवास संस्थेतील देखरेख करणाऱ्या एका कर्मचारी महाराजाने आपल्याच संस्थेत असलेलया बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.ही घटना १७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. आळंदी पोलिसांनी वारकरी संस्थेतील महाराजाला अटक केली आहे. व्यकंटेश काशिनाथ माळनूर असे अटक करण्यात आलेल्या महाराजाचे नाव आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, आळंदीत एक अनाथ मुलांची निवास संस्था आहे. या संस्थेमध्ये बारा वर्षाचा अनाथ अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षण घेत आहे. तो शनिवारी पहाटे झोपलेलया अवस्थेत त्या कर्मचारी महाराजाने त्याला उचलून टीव्ही असणाऱ्या खोलीत नेले. तसेच त्याला मोबाईल खेळायला देत त्याच्यावर अनैसर्गिक रित्या बलात्कार केला. याला मुलाने विरोध केला तरी देखील त्याने ऐकले नाही. आणि त्याला गप्प करत शांतपणे सर्व सहन करावे लागले असे फिर्यादीत नमूद केले आहे.दरम्यान, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.