Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यात कालपासून मुसळधार

Date:

पुणे : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून पुण्यात जोरदार हजेरी लावली आहे. काल रात्रभर पाऊस सुरु होता. आज ढगाळ वातावरण अजिबात दिसून आले नाही. सर्वत्र ऊन पडले होते.

अशातच अचानक सायंकाळी ५ नंतर वादळी वाऱ्यासहित पुण्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून पुणेकर घराबाहेर खरेदीसाठी पडले होते. पण चनक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. पावसाचा जोर चांगलाच होता, परिणामी अनेक रस्त्यांवर पाणी साठले.

पुण्यातील मध्यवर्ती भागाबरोबरच कात्रज, सिंहगड रोड, धायरी, कर्वेनगरम, कोथरूड, हडपसर, भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. नागरिक खरेदीसाठी बाहेर पडेल असून अचानक झालेल्या पावसाने त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.

हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रविवारी (दि. १८) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असणार आहे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही यलो अलर्ट जारी केला आहे.

पुण्यात यलो अलर्ट

पुणे शहरात शनिवारी दिवसभर उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. तसे तर गेल्या आठवड्यापासूनच उष्णता जाणवत होती. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मात्र आकाशात ढगांची गर्दी झाली आणि जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पुढील दोन-तीन दिवस पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. २१ ऑगस्ट रोजी पुण्यात ऑरेंज अलर्ट असणार आहे.

रस्ते पाण्याखाली…

पुण्यात शनिवारी सायंकाळनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. त्यामुळे रात्री अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसाने दुचाकीस्वार घराबाहेर अडकून पडले. पावसामुळे बरेच रस्ते जलमय झाले. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली हाेती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला:6 जण ठार

मुंबई-कल्याण पूर्व मधील मंगलराघो नगर परिसरात आज दुपारी एक...

यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांचा गौरव

शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतील तिसऱ्या स्थानाबद्दल मंत्रालयात द‍िला पुरस्कार पुणे (दि...

स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा -भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

पुणे -आज पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाताना इंटरनेटच्या...