नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
पाषाण मध्ये आयोजित श्रावण महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे-महिलांना स्वावलंबनासाठी त्यांना प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने कोथरुड मतदारसंघात अनेक उपक्रम राबविले आहेत. यामुळे महिला स्वावलंबनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.
श्रावण महिन्यानिमित्त नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि भाजप कोथरुड उत्तर मंडलाच्या संयोजनातून पाषाण मधील कुंदन हॉल येथे महिला व्यावसायिकांसाठी प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी मधील लघु उद्योजिका महिलांनी यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नामदार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, उत्तरच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा अस्मिता करंदीकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, रोहन कोकाटे, दीपक पवार,वैदेही बापट, विजया चांदोरकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महिलांना स्वावलंबनासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असते. त्यातूनच एक यशस्वी उद्योजिका निर्माण होते. आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देऊ शकते. त्यामुळे महिला स्वावलंबनासाठी त्यांना आर्थिक सक्षम केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी गेल्या चार वर्षांपासून कोथरूड मध्ये विविध उपक्रम राबविले आहेत. महिला बचत गटांना त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. अनेक महिलांची आर्थिक भरभराट झाली आहे. बाणेर बालेवाडी पाषाण मधील महिलांनीही आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी एकत्रित यावे. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही देखील यावेळी दिली.