पुणे,: अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तथापि, अर्जप्रकरणावर प्रक्रिया करुन मुद्रांक शुल्काची मागणी नोटीस पाठविण्यासाठी कालावधी आवश्यक असल्याने नागरिकांनी २५ ऑगस्टपर्यंत योजनेचे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील नागरिकांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा. योजनेची माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत देण्यात येते. मागणी नोटीस विहीत वेळेत देता यावी याकरीता नागरिकांनी २५ ऑगस्टपर्यंत प्रकरणे दाखल करावी, याची नोंद घ्यावी, असे पुणे शहरचे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी माईनकर यांनी कळविले आहे