Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अंतरिक ऊर्जा वाढवून जीवन संतुलित करा- मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स डॉ.प्रचिती पुंडे

Date:

– प्रोलक्स गाला: द ग्लॅमोवेल एक्स्ट्रावागांझा कार्यक्रमाची सुरूवात

पुणे, १४ ऑगस्ट: “अनेक समस्यांपासून स्वतःला मुक्ती मिळवायची असेल तर शरीराव्यतिरिक्त स्वतःला आजच्या आधुनिक जगात ग्लॅमोवेल पद्धतीमध्ये सहज आणि कमी वेळात वर्क लाइफ बॅलन्स करायल शिका. चिंतन करून स्वतःचे गुण लक्षात घेऊन क्षणिक आवेग, आकांक्षा आणि नकारात्मक विचारांच्या प्रवाहांना नियंत्रित करून योग्य दिशा दिली जाऊ शकते. त्यातुनच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उपलब्ध होते.”असे विचार प्रोलक्स प्रोडक्शनच्या संस्थापक संचालिका आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स डॉ.प्रचिती पुंडे यांनी व्यक्त केले.
प्रोलक्स ग्लॅमोवेलच्या वतिने ‘प्रोलक्स गाला: द ग्लॅमोवेल एक्स्ट्रावागांझा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरात ८ ते ११ ऑगस्ट या काळात विविध ठिकाणी रॅली काढण्यात आली.
आपल्या व्यस्त जीवनात ग्लॅमर आणि आरोग्य यांच्यातील समतोल राखण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या मुख्य उद्देश्य ठेऊन या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली प्रोलेक्स आणि ग्लॅमोवेलचे बाणेर येथील मुख्यालयातून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ४ दिवस काढण्यात आली. डॉ.प्रचिती पुंडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीत शेकडो नागरिकांनी उत्फूर्तपणे सहभाग दर्शविला.
एनसीसी हेड क्वॉटर, टाईम्स अ‍ॅण्ड ट्रेड आणि डेक्कन येथील श्री महावीर जैन विद्यालय येथील विद्यार्थी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांना डॉ.प्रचिती पुंडे यांनी ३ ते ३० सेकंदापेक्षा कमी वेळेत जीवन सहजरित्या कसे करावे या संदर्भात छोट्या छोट्या टीप्स दिल्यात.
आयोजित कार्यक्रम रश्मी मॅडम, कमांडर अल्पेश मोहन, ट्रेनर व डिपार्टमेंटल एचओडी राजेश सिंग, तरावडे आणि यशराज यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
डॉ.प्रचिती पुंडे म्हणाल्या, ” आपण आपली आंतरिक ऊर्जा दिवसभर वापरतो. पण ती साठवत नाही, ज्यामुळे जीवन असंतुलित होते. हे संचित करून मनुष्य आपल्या जीवनाचा समतोल साधू शकतो. आजची पिढी मोबाइल व बाह्य जगात स्वतःला विसरली आहे. त्यामुळे ग्लॅमोवेल मुळे स्वयं प्रेरणेची गरज आहे. त्याचप्रमाणे एनसीसीचे विद्यार्थ्यांना होणार्‍या मसल पेन कमी करण्यासाठी आंतरिक मन ढासळू देऊ नये यासाठी मनावर सरळ सरळ ताबा कसा मिळवावा या संदर्भात अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट व ग्लॉमोवेलच्या टिप्स दिल्यात.”
“आनंदी जीवनासाठी प्रत्येकाशी हसतमुख बोलावे. कामाच्या ठिकाणी इंटरपर्सनल रिलेशन मॅनेज कसे करावे यावर विस्तृत माहिती डॉ. पुंडे यांनी दिली. विद्यार्थीदशेत मुले सतत मोबाइलच्या आहारी जातात. त्यांच्या समोर सक्सेस, नोकरी, शारीरिक व्यायामाचा अभाव, प्रत्येक गोष्टीची काळजी करणे या सर्वांपासून सुटकेसाठी डॉ. पुंडे यांनी ऊर्जा जागृतीच्या टीप्स दिल्यात. तसेच आपले प्रश्न आपण कसे सोडवायचे या संदर्भातील व्यायाम शिकविण्यात आले. ग्लॅमोव्हेलच्या लक्झरी आणि आरोग्याचे परिपूर्ण सुसंगत मिश्रण करण्याच्या क्रांतिकारक संकल्पनेला त्यांनी सर्वांच्या समोर मांडले.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवरायांच्या प्रेरणेतूनच बलशाली भारत घडेल-स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज

विदर्भ महेश असोसिएशन आणि फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी यांच्या...

गवताच्या आगीत ७ वीजवाहिन्या जळाल्या;तळवडे,  देहूगाव परिसरात वीजपुरवठा विस्कळीत

पुणे, दि. २९ एप्रिल २०२५:तळवडे येथे गवताच्या आगीत महावितरणच्या...

पीएमआरडीएचे अधिकारी सोमवार, गुरुवारी नागरिकांना भेटणार

नागर‍िकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगर आयुक्त यांचा न‍िर्णय पुणे (दि.२९) :...