भारतीय जनता पक्षाचा ४०० पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला, महायुती सरकार सर्वात भ्रष्ट सरकार: रमेश चेन्नीथला.

Date:

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला: नाना पटोले.

केंद्रात आणि राज्यात लुटारूंचे सरकार, प्रत्येक कामात ४० टक्के कमिशनखोरी: विजय वडेट्टीवार

प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा राज्यस्तरीय विजय संकल्प मेळावा संपन्न.

मुंबई, दि. ९ ऑगस्ट २०२४

भारतीय जनता पक्षाचा ४०० पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला. काँग्रेस पक्ष एससी, एसटी, मागास समाजाला प्राधान्य दिले जात आहे, लोकसभेच्या निवडणुकीत या समाजाचे प्रतिनिधीत्व वाढले आहे आणि विधानसभा निवडणुकीतही असाच विजय संपादन करावयाचा आहे. एससी एसटी प्रवर्गाच्या ५४ जागा आहेत या जागांतील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काम करावे लागेल. विधानसभेला एससी, एसटी प्रवर्गाच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा राज्यस्तरीय विजय संकल्प मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय एससी विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठीया, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अनिस अहमद, आमदार राजेश राठोड, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते. रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, विविध राज्यात आरक्षणाची मागणी जोर धरत आहे, जास्तीत जास्त समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागणार आहे तसेच ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागणार आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्धार केला आहे. नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संसदेला नमन केले आणि संसद भवन बदलले यावेळी मोदींनी संविधानाला नमन केले आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवायला निघाले आहेत. देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रातील महायुती सरकारने केला आहे. विकास काम होत नाही फक्त लुट सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटींचा आरोप केला, प्रफुल्ल पटेलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाही भाजपात प्रवेश देऊन पवित्र केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जनगणनेची भूमिका मांडली, बहुजनांची आर्थिक, सामाजिक शैक्षणिक सर्वे केला तरच न्याय मिळेल पण भाजपा व मोदी सरकारचा मात्र जनगणनेला विरोध आहे. युपीए सरकारने आणलेल्या महिला आरक्षणाला भाजपाने विरोध केला होता आणि तेच विधेयक भाजपाने मंजूर केले पण त्याची अमंलबजावणी केली नाही. महिला आरक्षणाची अंमलबजावणी न करून केंद्रातील भाजपा सरकारकडून लाडक्या बहिणींवर अन्याय केला आहे आणि राज्यात मात्र लाडकी बहिण असा दुजाभाव भाजपा करत आहे. विधानसभेला महायुती १०० जागाही जिंकू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र भाजपा युती सरकारने गुजरातला गहाण ठेवला आहे असा घणाघाती हल्लाबोल करत महाराष्ट्रातून भाजपा युती सरकार गेले की दिल्लीतील सरकारही कोलमडेल आणि जनगणना करण्याचा मार्ग मोकळा होईल असेही नाना पटोले म्हणाले.

यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की आज शौर्याचा दिवस आहे आजच्या दिवशी इंग्रजांना चले जाओ भारत छोडो चा नारा दिला होता. करो या मरो या निर्धाराने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा दिला होता. भारतीय जनता पक्ष लोकसभेत बेईमानी करुन जिंकला. आता पुढची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. भाजपाच्या १०० पिढ्या संविधान संपवू शकत नाहीत. मोदींची ५६ इंचा ची छाती आता ३२ इंच झालीय. केंद्र आणि राज्यातले सरकार लुटारूंचे आहे. मतांची झाली कडकी म्हणून आठवली बहीण माझी लाडकी अशी महायुती सरकारची अवस्था आहे. या सरकारने महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. १० लाख कोटीच्या जागा विकल्या आहेत. प्रत्येक कामात ४० टक्के कमिशन खोरी सुरु आहे. फक्त नावाने आणि वारसाने आंबेडकर होता येत नाही तर कामातून आणि विचारातून आंबेडकर असले पाहिजे असा टोला प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

यावेळी राजेश लिलोठीया म्हणाले की,भाजपाने लोकसभा निवडणुकीला ४०० जागा जिंकून संविधान बदलण्याचा नेरेटिव्ह पसरवला होता परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान रक्षणाचा संकल्प हाती घेतला व भाजपाचा हा डाव जनतेने हाणून पाडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान रक्षणाचे काम काँग्रेस व इंडिया आघाडीने केले. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ९९ जागी विजय मिळला त्यात ३७ जागा एससी, एसटी समाजाच्या आहेत. विधानसभेला एससी विभागातील पदाधिकाऱ्यांचा विचार करावा, महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी काम करा असे आवाहनही लिलोठीया म्हणाले.

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा ज्यांनी केली त्या भाजपाला धडा शिकवला व मोदी सरकारचे एनडीए सरकार झाले. सामाजिक न्याय विभाग काही काम करत आहे का असा प्रश्न पडतो. महायुती सरकार फक्त कंत्राटदारांचे खिशे भरत आहे व स्वतः मलई खात आहे. भाजपा सरकारने संविधानाची प्रस्तावना अभ्यासक्रमातून काढण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रासह चार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर केंद्रातील एनडीए सरकारलाही हादरा बसेल. लोकसभेत सक्षम विरोधी पक्ष असल्याने १० वर्षानंतर सरकारचे विधेयक संमत होऊ शकले नाही. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सरकारला संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले. आता विधानसभा निवडणुकीत विजय मिळवा आणि महाविकास आघाडीचे सरकार आणा,असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

यावेळी सिद्धार्थ हत्तीअंबीरे म्हणाले की, १० वर्षापासून भाजपा सरकारमुळे मागास समाज अनेक योजनांपासून वंचित आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील दलित, मागास समाज काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तसाच विधानसभेतही काँग्रेस पक्षाच्या मविआच्या पाठीशी उभे राहिल व भाजपा महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काम करेल. मागास समाजातील लोकांना निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी हत्तीअंबिरे यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...