पुणे-खडकी शिक्षण संस्थेच्या पी.पी.एम.बाल शिक्षण मंदिरात बॅग व गणवेश वाटप शिक्षण मंडळ माजी अध्यक्ष संगीता तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.पायल तिवारी बिटिया फांउंडेशन यांच्या सहकार्याने पी पी एम बाल शिक्षण मंदिरात शालेय सहित्य ,स्कुल बॅग,गणवेश वाटप शिक्षण मंडळच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी व हर्ष तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी शालेय समिती अध्यक्ष राजेंद्र भुतडा, संचालक सुधीर फेंगसे, कमलेश पंगुडवाले, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे विशाल जाधव, सुंदरताई ओव्हाळ, मंहमंद शेख, अंजली दिघे, विकास कांबळे, अजित थेरे, संजय फेंगसे, रूपेश भालेराव, इ मान्यवर उपस्थित होते,शालेय गणवेश हे स्वत संगीता तिवारी यांनी कै.पायल तिवारी यांच्या जंयती निमित्त भेट दिले. आलेगांवकर प्राथमिक विघालयाच्या मुख्याधिपिका जयश्री माकर ,बाल शिक्षण मंदिराच्या प्रमुख सौ.शुंभागी बरेल्लु, शिक्षिका वंदना शिवशरण,यांनी कार्यक्रामाचे नियोजन केले.
संगीता तिवारी यांनी संस्थेतील सर्व विभाग पाहणी केली व संस्था गोरगरीब साठी कार्य करित आहे यांचे कौतुक केले.
कार्यक्रमात प्रथम सरस्वती पुजन झाले त्यानंतर पायलची जंयती केक कापून करणंयात आली .
सुत्र संचालन सौ बरेल्लु यांनी केले स्वागत राजेंद्र भुतडा तर आभार वंदना शिवशरण यांनी मानले .