टायगर श्रॉफने नृत्याची आवड एक पाऊल पुढे टाकत ‘मॅट्रिक्स डान्स अकादमी’ केली लाँच
बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ केवळ त्याच्या ॲक्शन सीक्वेन्ससाठीच ओळखला जात नाही तर त्याने अनेकदा त्याच्या सिग्नेचर डान्स मूव्ह्सने इंटरनेट प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘व्हिसल बाजा’ ते ‘जय जय शिवशंकर’ ते ‘मस्त मलंग झूम’पर्यंत टायगर श्रॉफच्या नृत्यकौशल्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. टायगर ने याची पहिली-वहिली नृत्य अकादमी ‘मॅट्रिक्स डान्स अकादमी’ लाँच केली आहे.
टायगर प्रोल एक ॲक्टिव्हवेअर आणि ॲक्सेसरीज ब्रँड आणि ‘MMA मॅट्रिक्स अश्या अनेक उद्योगात असताना ही डान्स अकादमी हे नवीन पाऊल आहे. ‘मॅट्रिक्स डान्स अकादमी’ च्या माध्यमातून टायगर श्रॉफने जॅझ, हिप-हॉप, बॅले आणि इतर अशा विविध नृत्य प्रकारांच्या गुंतागुंतीचा शोध घेऊन नृत्याचे सार देशभरात पसरवण्याची कल्पना केली आहे.
या नवीन उपक्रमासह टायगर श्रॉफचे उद्दिष्ट आहे की महत्त्वाकांक्षी कलाकारांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षक, तज्ञ मार्गदर्शन आणि रंगमंचावर चमकण्याची संधी देणं ! टायगर श्रॉफ या रोमांचक नवीन भूमिकेत पाऊल ठेवत असताना त्याचे प्रेक्षक भारतातील नृत्याच्या भविष्यावर त्याच्या अकादमीच्या प्रभावाची उत्सुकतेने अपेक्षा करतात.
करिअरच्या आघाडीवर, टायगर श्रॉफ आता #TheTigerEffect ला ‘बागी 4’ मध्ये पूर्ण वैभवात दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.