पुणे : लव जिहादला बळी पडलेल्या ताईला न्याय मिळेल का? जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशा घोषणा देत राज्यासह संपूर्ण भारत देशात जिहाद्यांकडून निष्पाप लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि हल्ल्यातील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
पतित पावन संघटना पुणे शहर यांच्या वतीने देशभरात निष्पाप नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व चौकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहराचे पालक शिवाजी चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष स्वप्निल नाईक, पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, माथाडी विभागाचे पुणे शहराचे अध्यक्ष रवी भांडवलकर, व्यापारी आघाडी पुणे अध्यक्ष अक्षय जम्बुरे, गुरु कोळी, मिलिंद तिकोणे, महेश पाटोळे, यादव पुजारी, ध्रुव जगताप, अशोक परदेशी, मढीआप्पा माळी, बाबा मिसाळ, हरी जगधने, दीपक धोत्रे, अमर लष्करे, संजय पिसाळ, संजय वनगे यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते.
शहराध्यक्ष स्वप्नील नाईक म्हणाले, पुण्यासह संपूर्ण भारतामध्ये जिहाद्यांनी लव्ह जिहाद, गो रक्षकांचा बळी घेणे हा जो ऊच्छाद मांडला आहे, त्या विरोधात पतित पावन संघटना पुणे शहर तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, व त्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी पतित पावन संघटनेची आहे. या हल्ल्यांचा निषेध म्हणून यावेळी जिहाद्यांचे प्रतिकात्मक पोस्टर जाळण्यात आले.