पुणे-या राज्यात बाहेरून येणाऱ्या, परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना तुम्ही मोफत घरे वाटत आहात. आणि या राज्यात राहणारे नागरिक सध्या भिका मागत आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. याला सरकार चालवणे म्हणतात का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य म्हणून महाराष्ट्रावर कोणाचे लक्ष आहे की नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. देशात प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करत आहे. मात्र, देशात महाराष्ट्राच्या विचार करणारे कोणी आहे का? असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.उपमुख्यमंत्री पुण्याचेच आहेत तरीही पुण्यात ही स्थिती? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्याला दोन उपमुख्यमंत्री असले तरी लक्ष कुणाचेच नाही, अशी स्थिती असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला आहे. केवळ अधिकाऱ्यांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील परिस्थितीची पाहणी केली. त्या नंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
महानगरपालिकेतील अधिकारी, राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर हे सर्व मिळून दिसली जमीन की विक, असाच कार्यक्रम सध्या चालू आहे. पुणे शहर हे एक शहर राहिले नाही तर ते पाच शहरे झाली आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुण्यातील पूर परिस्थितीतील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून केंद्र सरकार राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही. त्यामुळे सध्या राज्यातील महानगरपालिकांना नगरसेवक नाहीत. त्यामुळे जबाबदारी घेणार कोण? प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणार कोण? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सध्या सुरू असलेला कारभार पाहता ही सर्व जबाबदारी प्रशासनाची असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकार आणि महानगरपालिका या सर्वांची ही जबाबदारी आहे. तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरून पुण्याची साफसफाई करण्यासाठी लोक बोलवावे लागतात, ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पुण्यासारख्या शहरांमध्ये जर बाहेरून लोक आणावी लागत असतील तर काय बोलणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. एवढ्या मोठ्या शहरात साफसफाईसाठी बाहेरच्या जिल्ह्यांमधून साफसफाई कर्मचारी बोलवावे लागतात, या वर देखील राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. अधिकाऱ्यांचे निलंबन करून काही होणार नाही, त्याने प्रश्न सुटणार का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज्याचा मणिपूर होण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. या संदर्भात शरद पवार यांनी केलेल्या विधानावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी एका वाक्यातच हा विषय संपवला. शरद पवार यांचे स्टेटमेंट मी ऐकले नाही, पण पवार साहेबांनी याला हातभार लावू नये, अशी टीका राज यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथे पूर परिस्थिती पाहणी करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यांमध्ये दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री असताना याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यातच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत देखील त्यांना प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी शरद पवार यांनाही खोचक शब्दात टोला लगावला. राज्याचा मणिपूर होण्यासाठी शरद पवार यांनी हातभार लावू नये, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर खोचक टीका केली आहे.