टीव्ही अभिनेत्री ने मानले आभार.
मुंबई– येथील टीव्ही अभिनेत्री आश्लेषा सिंग यांना एका मालिका निर्मात्याने एक मालिकेसाठी अडीच वर्षांपूर्वी करार केला. त्यानुसार सिंग यांनीतो करार पूर्ण करत कामही पुर्ण केले पण निर्मात्याने ठरलेले पुंर्ण मानधन / मोबदला दिला नाही,. यासंबंधी अभिनेत्री आश्लेषा सिंग यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही निर्माते पैसे देण्यास नकार देत होते.यासंबंधी सिंग यांनी भाजप चित्रपट कामगार आघाडी चे अध्यक्ष समीर दीक्षित, सरचिटणीस राकेश ठाकूर यांच्या कडे तक्रार केली. सदर तक्रारीनंतर भाजप चित्रपट आघाडी कडून कसून सतत पाठपुरावा करून अभिनेत्री आश्लेषा सिंग यांचे पूर्ण ठरलेले मानधन मिळवून दिलें. या सर्व प्रकरणात भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे अध्यक्ष विजय हरगुडे जातीने लक्ष घालून होते. याबद्दल भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी चे मनःपूर्वक आभार मानले.
भाजप चित्रपट आघाडीने अभिनेत्रीला मिळवून दिले थकीत मानधन
Date: