केंद्रीय गृहमंत्र्यांवर बोलण्याऐवजी राज्यात त्यांनीच केलेल्या मविआ काळातील गृहमंत्र्यांनी काय केलं होतं? याचा विचार करून बोलायला हवं होतं.
पुणे- शरद पवार यांनी अमित शहांवर केलेल्या टीकेला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले असून कोर्टाने अमित शहांना निर्दोष सोडले होते याचे बहुधा पवार साहेबांना विस्मरण झालेले दिसते आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांवर बोलण्याऐवजी राज्यात त्यांनीच केलेल्या मविआ काळातील गृहमंत्र्यांनी काय केलं होतं? याचा विचार करून बोलायला हवं होतं.त्यांचेच गृहमंत्री जेलवारी करून आलेत. १०० कोटींच्या खंडणीवसुलीसारखा गंभीर आरोप त्यांच्या गृहमंत्र्यांवर आहे, याचं विस्मरण बहुतेक पवार साहेबांना झालेले दिसतेय असे मोहोळ यांनी म्हटले आहे.
अमित शहा यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली . त्यावर, तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला होता, असा प्रति टोला शरद पवार यांनी लगावला.अगोदर शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. एका तडीपार व्यक्तीच्या हाती देशाचं संरक्षण आहे. त्यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे आहेत, असा हल्ला शरद पवार यांनी चढवला होता.यावर बावनकुळे यांच्यानंतर आता शहांचे समर्थक मोहोळ देखील सरसावले आहेत
शरद पवार यांनी उल्लेख केलेलं अमित शाह यांच्या विरोधातील प्रकरण हे व्यापक राजकीय षड्यंत्राचा भाग होतं.अमितभाईंच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब करून सुप्रीम कोर्टाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ केलं.त्यामुळे अमितभाईंविरोधात रचलेल्या या खोट्या राजकीय षड्यंत्राचा पवारसाहेबांनी उल्लेख करायचं काही कारण नव्हतं.असेही त्यांनी म्हटलेय .