पुणे (प्रतिनिधी): पर्वती, शिवाजीनगर मधील विविध वस्त्यांमध्ये लोकायत संघटनेद्वारे मतदार नाव नोंदणी बाबत जनजागृती करण्यात आली. हातावर पोट असलेल्या कष्टकरी घटक ज्यात रिक्षाचालक, पथारी, टेम्पोचालक, घरकाम करणाऱ्या महिला यांना आपलं नाव मतदार यादीत कस शोधायचं? जर मतदार यादीत नाव नसेल तर काय करावं लागत याबाबत माहिती देण्यात आली.
उपक्रमाचे समन्वयक ऋषिकेश येवलेकर यांनी सांगितले की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या दरम्यान जाणवलं की वस्ती पातळीवर नागरिकांच्या नाव नोंदणी दरम्यान पत्ता बदलणे, जन्म तारीख बदलणे, नावाची स्पेलिंग चुकलेली असणे अशा अडचणी आहेत पण ते कसे बदलावे याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नव्हती त्यामुळे निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाईन ॲप द्वारे जनजागृती करण्यात आली. जवळपास प्रत्येकाच्या घरात एखादा तरी स्मार्ट फोन असतो घरबसल्या मोबाईल वरच मतदार नाव नोंदणी सहजपणे होऊ शकते तसेच लोकशाहीत प्रत्येकाला मतदान देण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येकाला आहे त्याचा वापर सर्वानी केला पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाईन ॲप कस वापरावं याबाबत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्यात आले होते त्यामुळे नागरिकांनी अँपद्वारे अडचणी सोडावं सोप गेलं जवळपास ३५० पेक्षा अधिक नागरिकांना याचा लाभ झाला