पुणे-मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली . सह्याद्रीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे की नाही? याबाबत शरद पवारांसह ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट कराव्यात, असे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले होते. तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देखील मराठा आरक्षणावरुन शरद पवार यांच्यावर टिका केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. यामुळे या भेटीच्या वृत्ताकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चेसाठी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
Date:

