Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पिंपरी चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चारुशीला जोशी यांची निवड

Date:

उपाध्यक्ष नलावडे, सचिव रानवडे व खजिनदारपदी भुजबळ
पिंपरी, पुणे (दि. २२ जुलै २०२४)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदावर चारुशिला किशोर जोशी यांची निवड करण्यात आली.
सोमवारी (दि.२२) संचालक मंडळाची बैठक निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे (शहर-१) संतोष लादे यांच्या अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये विजय मुरलीधर नलावडे (उपाध्यक्ष), योगेश सुर्यकांत रानवडे (सचिव) आणि विशाल बाळासाहेब भुजबळ (खजिनदार) यांचा समावेश आहे.
यावेळी पतसंस्थेचे पदाधिकारी व विद्यमान संचालक यांनी माजी अध्यक्ष झिंजुर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार विनम्र व तत्पर सेवा आणि पारदर्शकपणे काम करण्याचा संकल्प केला. तसेच सभासदांना बचतीच्या ठेवीवर ९ टक्के व्याज व कन्यादान ठेवीवर १० ते १०.५० टक्के व्याजदर करुन संस्था स्वभांडवलावर उभी करण्याचे धोरण ठरविले आहे. यामुळे सभासदांना कमीतकमी (११ टक्के) व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहे.
या पतसंस्थेची १५ वर्षापूर्वी वार्षिक उलाढाल १७ कोटी रुपयांच्या जवळपास होती. माजी अध्यक्ष झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली २० वर्षात आता पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २०९ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे व कर्ज मर्यादा ५० हजारांहून २० लाख रुपये पर्यंत वाढविली आहे. थकबाकीचे प्रमाण ०.४५ टक्के इतके अत्यल्प आहे त्यामुळे संस्थेला सतत ऑडीट वर्ग ‘अ’ वर्ग दर्जा मिळालेला आहे. संस्था स्थापनेपासून सलग ५० वर्ष नफा मिळवून नफ्यातून सभासदांना जास्तीत जास्त १४ टक्के व १२ टक्के लाभांश वाटप केले आहे. संस्थेच्या सलग २५ वर्ष सभासद व सेवानिवृत्त सभासदांना बक्षिस म्हणून पाच हजार रुपये वाटप करण्यात येते. तसेच संस्थेच्या मयत सभासदांचे कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील ही पहिली पतसंस्था आहे.
यावेळी संस्थेचे विद्यमान संचालक व माजी पदाधिकारी सनी कदम, वैभव देवकर, विजया कांबळे, विश्वनाथ लांडगे, अनिल लखन, शिवाजी येळवंडे, संदीप कापसे, नथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, कृष्णा पारगे, गणेश गवळी, अभिषेक फुगे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय मुंडे, युनुस पगडीवाले व संस्थेचे सल्लागार मनोज माछरे, नितीन समगीर, संजय कापसे, मंगेश कलापुरे, उमेश बांदल, चंद्रशेखर गावडे, विशाल बाणेकर व प्रभागातील संघटनेचे पदाधिकारी व व्यवस्थापक प्रल्हाद सुतार तसेच महासंघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

8000 कोटीच्या थकीत कर्जामुळे 6 बँका संकटात

मुंबई: दूरसंचार कंपनी एमटीएनएल सात बँकांकडून आणि इतर काही...

मुंबई-पुणे महामार्गावरील पुण्यातील तिघांचा मृत्यू

पुणे:मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा परिसरात रविवारी रात्री भरधाव ट्रकने मोटारीला...

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात:भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे...