पुणे-कर्वेनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या औचित्याने ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला या संदर्भात स्वप्नील दुधाणे यांनी सांगितले कि,’आपण प्रत्येक महिन्यातील तिसऱ्या रविवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. या महिन्यातील दि. २१ जुलै रोजी आपल्या विठ्ठेश्वर देवस्थान, कर्वेनगर या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.गुरुपौर्णिमेच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय डॉ. भालचंद्र कापरेकर यांनी सुश्राव्य भाषेत गुरुपौर्णिमेचे महत्व विषद करत श्रोते वर्गांना खिळवून ठेवले. याप्रसंगी आपल्या प्रभागातील ऐश्वर्या ताई जोशी यांची गुरुवंदना आणि कुमारी रमा शिंदे या शालेय मुलीचा राजमाता जिजाऊ माँसाहेब विषयी पोवाडा विशेष उल्लेखनीय होता.आपल्या समाजात आपले अनुभव आणि मार्गदर्शन यांच्यामुळे आदरस्थानी असणाऱ्या सर्व ज्येष्ठ गुरुजनांचा सन्मान करत भविष्यातही त्यांचे मार्गदर्शन आमच्या पाठीशी असेच राहो, अशी सदिच्छा आम्ही व्यक्त केली.
