Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी ऑक्टोबरमध्ये परीक्षा;स्पेस एज्युकेशनचा शालेय स्तरावरील भारतातील पहिलाच प्रयोग

Date:

स्वान रिसर्च फाऊंडेशनचा पुढाकार
पुणे,: अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनच्या पुढाकारातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता ६ वी ते १० वीच्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून, या परीक्षेसाठी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येईल, अशी माहिती स्वान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी आम्ही पुणेकर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत जाधव, सचिव भूषण गायकवाड, स्वान रिसर्च फाउंडेशनचे सहसचिव अजित कारके, संचालक नारायण गायकवाड,उमेश वाखारे आदी उपस्थित होते.
शशिकांत कांबळे म्हणाले , “स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये सहावी ते १० वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात येत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगना, बिहार या राज्यात, तसेच भारताबाहेरील सार्क देशामधील नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, मालदीव या देशामध्ये ही परीक्षा होणार आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल. यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचे आहे. या परीक्षेचे भारतासाठीचे अँबेसेडर युनिसेफमधील ऍडव्होकेट कार्तिक वर्मा हे आहेत, तर इस्रोतील शास्त्रज्ञ वैष्णवी होनप आहेत. यूएनआयचे उपाध्यक्ष आणि सार्कचे माजी महासंचालक रिंचल चोपेल, सार्कसाठी अँबेसेडर सुरज गायकवाड असणार आहेत.
हेमंत जाधव म्हणाले, “ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी १५ जुलैपासून नावनोंदणी सुरु झाली असून, १५ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा येथे प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे.”

अजित कारके म्हणाले, “आज पालक आपल्या मुलाने अनेक रिऍलीटी शोमध्ये सहभागी व्हावे, याकरिता अनेक प्रयत्न करताना दिसतात. परंतु ही परीक्षा अंतराळ एज्युकेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असेल. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://swanrsfoundation.com/event/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ७०५८१३४५८२ या नंबरवर संपर्क साधावा, ही विनंती.”—————————————
विज्ञान जागृतीसाठी महत्वपूर्णआज संपूर्ण जग विकासाच्या वाटेवर आहे. माणूस पृथ्वीपुरताच मर्यादित न राहता अवकाशातही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह तर मानवाच्या अगदी ओळखीचे झाले आहेत. अंतराळासंबंधित प्रयोग, अभ्यास आणि संशोधन हे प्रत्येक देश स्वतःच्या पद्धतीने करत असतो. संबंधित संशोधनासाठी अनेक देशांनी स्वतःची अंतराळ संस्था (स्पेस एजन्सी) तयार केली आहे. जगातील १९५ देशांपैकी फक्त ७२ देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. ‘नासा’ ही त्यापैकी सर्वांत सुप्रसिद्ध एजन्सी आहे. तीस वर्षांपूर्वी डॉ. वॉन ब्राऊन यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच खगोलशास्त्रात रुची निर्माण व्हावी आणि या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवता यावीत, यासाठी यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर सुरु केले, असे शशिकांत कांबळे यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नितीन गडकरी यांची भेट घेऊन आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरीकरांच्या वतीने मानले आभार

पुणे : पुणे-नगर रस्त्यावर वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी...

तीन वर्षांपासून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार रखडला; आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली चौकशीची मागणी

पुणे: तालुका पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना...