पुणे : इनरव्हील क्लब रिव्हरसाईड डिस्ट्रिक्ट ३१३च्या अध्यक्षपदी हीरा राजीव अगरवाल यांची निवड झाली आहे. सचिवपदी शशी अगरवाल, खजिनदारपदी अनिता निवेतिया यांची निवड झाली आहे. इनरव्हील क्लबच्या प्रांताध्यक्ष डॉ. शोभना पालेकर यांच्या हस्ते हीरा अगरवाल यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी प्रांत सचिव डॉ. दीपशिखा पाठक, माजी सहयोग अध्यक्षा स्मिता पिंगळे, प्रांत विस्तार सेवा आयोजक डॉ. आशा देशपांडे, माजी प्रांताध्यक्ष चारू चिंचणकर, सुनंदा हुल्याळकर, मुक्ती पानसे, प्रांत साक्षरता समन्वयक मोहिनी राठी, विभागीय समन्वयक शोभा श्रीकांत यांच्यासह इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, मित्रपरिवार, अगरवाल कुटुंबीय उपस्थित होते. इनरव्हील क्लबचे हे १०१ वे वर्ष असून, यावर्षी अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळणे, ही आनंदाची गोष्ट असल्याचे हीरा अगरवाल यांनी नमूद केले.
इनरव्हील क्लब पुणे रिव्हरसाईड हा पुण्यातील नव्हे, तर प्रांतातील एक प्रथितयश क्लब आहे. या पदग्रहण सोहळ्यात नवीन १२ सदस्यांचे स्वागत करण्यात आले. समाजाच्या सक्षमीकरणासाठी क्लबच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.