पुणे -पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. फटाका गोदामाला ही आग लागल्याची माहिती सूत्रांकडून माहिती मिळत आहे. गोदामात आणखी काही कामगार फसल्याचे सांगण्यात येत आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. कारखान्यात आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत सहा महिलांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी कामगारांचा शोध सुरू आहे. जखमींमध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. कारखाना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलिस ठाण्यांतर्गत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींमध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून सहा जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या मेणबत्त्या आणि फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील फटाक्यांच्या गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती.
फुलझडी मेणबत्तीचा कारखाना – पालिका आयुक्त
या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.