Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ‘अपघातमुक्त वारी’ अभियानाचे आयोजन

Date:

पुणे, दि. ४ : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांत रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी यादृष्टीने ‘अपघातमुक्त वारी’ अभियानाचे आयोजन करण्यात आले.

या अभियानात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत आळंदी रोड, दिवे कार्यालय येथे शुभ्र वस्त्रात टाळ मृदुंगाच्या साथीने वारकऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, लेन शिस्त, उजवीकडून चाला, वेग नियंत्रण आदीबाबत जागर करण्यात आला. ‘डावी बाजू गाडीची उजवी बाजू पायांची’ असा संदेश देणारी दोन वारी कालावधीची दिनदर्शिका तसेच ‘पाळावा नियम, बाळगावा संयम’, ‘सुरक्षित अंतर, सुरक्षित प्रवास’ असा संदेश असणाऱ्या एक प्रत्येकी हजार कापडी शबनम पिशव्या, रेनकोट व दोन हजार रस्ता सुरक्षेबाबत पत्रकांचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले.

रस्ता सुरक्षा परावर्तित फलक (रिफ्लेक्टर्स) सुयोग्य ठिकाणी लावून रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विश्रांतवाडी चोक, आळंदी रोड, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, दिवे घाट (सासवड रोड) व ऊरुळी कांचन येथे वारकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक व वाहनचालकांनी पालखीत उस्फूर्त सहभाग घेतला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...