पुणे-चिंचवड विधानसभा पाेटनिवडणुकीच्या वादातून भाजपचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्यासह आठ जणांनी रावेत परिसरात साेमवारी रात्री सराईत गुन्हेगार अमाेल गजानन गाेरगलेचा (वय-३४,रा. पुनावळे, पुणे) धारदार शस्त्राने वार करुन खून केला. याप्रकरणी ओव्हाळ यांना पाेलिसांनी अटक केली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड विधानसभा निवडणुकीत गाेरगले व आेव्हाळ यांच्यात वाद झाले हाेते. आेव्हाळ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. चिंचवड विधानसभा पाेटनिवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्यात व गाेरगलेमध्ये वाद झाला होता. गाेरगलेने आेव्हाळ यांच्या खुनाचा कट रचल्याचे उघडकीस येऊन त्याला अटकही झाली हाेती. तीन महिन्यांपूर्वी ताे येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला हाेता. तेव्हा जुना वाद डोक्यात ठेवून आेव्हाळ व त्यांच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला.
ओव्हळ आणि त्याच्या साथीदारांनी गोरगलेला एका हॉटेलवर गाठले. तेथे तो काहीजणांसोबत चहा पित बसला होता. प्रारंभी ओव्हळची आणि त्यांची बाचाबाची झाली आणि त्यानंतर या टोळक्याने त्याच्यावर जोरदार हल्ला केला. तेव्हा कोणीही त्यांना रोखले नाही.