समाजात बालकांचे नकारात्मक चित्र रेखाटन करण्याचा प्रकार निंदनीय …!
काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे दि २ जुलै –
राष्ट्रपतींच्या भाषणावर ऊत्तर देतांना, पंतप्रधान मोदी हे विरोधी पक्षावर असुयेपोटी एक प्रकारे गरळ ओकतांना, “भाजप देखील अनेक वर्षे विरोघी पक्षात बसल्याचे” सोईस्करपणे विसरले व आपल्या मुद्दे विरहीत भरकटलेल्या भाषणात मोदींनी वारंवार “बालक वर्गाची” थट्टा व कुचेष्टा केली व समाजात बालकांप्रती नकारात्मक चित्र रेखाटन करण्याचा प्रकार केला ही बाब निंदनीय असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. आजचे बालक विद्वत्तेच्या दृष्टीने किती तरी पुढे असल्याचे समाजात चित्र असताना किशोर वयीन विद्यार्थ्याचे शाळेतील चोरीचे किस्से सांगत व बालकांचे नकारात्मक चित्र रेखाटन करण्याचा प्रयत्न करत उच्चपदस्थ मोदी समाजातील बालकांमध्ये कोणता संदेश देऊ पहात असल्याचा संतप्त सवाल केला.
हे करण्या पेक्षा त्यांनी जनतेने पुरेसा कौल देऊन संविधानिक ‘विरोधी पक्षनेते’ पदी बसवलेल्या काँग्रेस नेते राहुल गांघी यांचे मुद्दे खोडुन काढले असते, तर भाषणजीवी प्रधान सेवकांची परीपक्वता व मुक्सदेगिरी देखील दिसुन आली असती मात्र ते न करता मोदींनी वारंवार “बालक, बाल-मन, बाल बुध्दीचे” शब्द प्रयोग करून, एक प्रकारे समाजात “बालक वर्गाचे नकारात्मक चित्र रेखाटण्याचा” निंदनीय प्रयत्न केल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले व मोदींनी चांगली संधी दडवून देशास पुन्हा आपल्या अहंकारी व हार मानसिकतेचेच दर्शन घडवल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की,
स्वतःला हिंदू म्हणवतात त्यांनी श्री कृष्ण चरित्रात, बाल-कृष्णा’नी कालिया या विष उधळणाऱ्या नागावर नियंत्रण मिळवून गोकुळवासियांचे रक्षण केले आणि आपल्या करंगळीच्या साहाय्याने व सहकाऱ्यांच्या काठ्यांच्या सहाय्याने गोवर्धन पर्वत उचलुन पुन्हा गोकुळवासीयांचे रक्षण केले होते..! अशा बाल श्रीकृष्णाचे चरित्रही त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे होते..! उदाहरणेच् द्यायची असतील तर ती आदर्श व प्रेरणादायी द्यावीत, अशा गौरवशाली उदाहरणांनी समाजात मुलांप्रती प्रेम, प्रेरणा, औदार्य आणि विश्वास भरून येतो.. अशी पुस्ती ही जोडली..!
संसदीय भाषणात मोदीं कडून “बालकांची” वारंवार थट्टा व कुचेष्टा…!
Date: