भोले बाबाचे खरे नाव सूरज पाल आहे. तो एटा जिल्ह्यातील बहादूर नगरी गावचा रहिवासी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण एटा जिल्ह्यात झाले. लहानपणी तो वडिलांना शेतीत मदत करायचा. शिक्षणानंतर यूपी पोलिसात नोकरी लागली. यूपीच्या 12 पोलिस ठाण्यांव्यतिरिक्त, सूरज पाल इंटेलिजन्स युनिटमध्ये तैनात होता.
सूरज पाल हा 28 वर्षांपूर्वी यूपी पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना इटावामध्येही तैनात झाला होता. नोकरीवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने आपले नाव बदलून नारायण हरी उर्फ साकार विश्वहरी ठेवले आणि तो धर्मोपदेशक झाला. लोक त्याला भोले बाबा म्हणू लागले. मेळाव्यात त्याची पत्नीही त्याच्यासोबत असते.
30 एकरात आश्रम, 10 वर्षांपूर्वी मैनपुरी पोहोचला
गावात बाबाचा आश्रम 30 एकरात पसरलेला आहे. जिथे कोणत्याही देवाची मूर्ती नाही. 2014 मध्ये त्याने मैनपुरीतील बहादूर नगर ते बिछवा येथे निवासस्थान बदलले आणि आश्रमाचे व्यवस्थापन स्थानिक प्रशासकाच्या हातात सोडले. सूत्रांनी सांगितले की, त्याचे स्थान बदलले असूनही, दररोज 12,000 लोक आश्रमात येत होते.
तो गाड्यांच्या ताफ्यासह फिरतो. माध्यमांपासून अंतर राखणाऱ्या बाबाचा प्रत्येक गावात खोलवर शिरकाव आहे. अनुयायी त्याची भगवान शिवाप्रमाणे पूजा करतात. त्यामुळे त्यासा भोले बाबा असे नाव पडले.
आधुनिक रूपाचा अवलंब केला
भोले बाबा इतर बाबांसारखा भगवा पोशाख घालत नाही. थ्री पीस सूट आणि रंगीत चष्म्यांमध्ये तो सत्संगात दिसतो. सूट आणि बूटचा रंग नेहमीच पांढरा असतो. अनेक वेळा कुर्ता-पायजमा आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून सत्संगाला येतो.
बाबाचा दावा- नोकरी सोडल्यानंतर देवाचा साक्षात्कार
भोले बाबा त्याच्या मेळाव्यात दावा करतात – 18 वर्षांच्या सेवेनंतर त्याने 90 च्या दशकात व्हीआरएस घेतला. त्याला माहित नाही की त्याला सरकारी नोकरीतून अध्यात्माकडे कोणी ओढले? व्हीआरएस घेतल्यानंतर देवाचा साक्षात्कार झाला. हे शरीर त्याच भगवंताचा अंश आहे हे भगवंताच्या प्रेरणेने प्रकट झाले. यानंतर त्याने आपले जीवन मानव कल्याणासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
तो म्हणतो- मी स्वतः कुठेही जात नाही, भक्त मला बोलावतात. भक्तांच्या विनंतीवरून तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरून सत्संग करतो. सध्या अनेक आयएएस-आयपीएस अधिकारी त्याचे शिष्य आहेत. त्याच्या सत्संगला अनेकदा राजकारणी आणि अधिकारी उपस्थित राहतात. विवाहसोहळेही आयोजित केले जातात.
अखिलेश यादव कार्यक्रमाला उपस्थित होते
सूत्रांकडून असे सांगण्यात येते कि, बाबाचा राजकारणाशीही संबंध आहे. काही प्रसंगी त्यांxच्या मंचावर यूपीचे अनेक बडे नेते दिसले. यामध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. जानेवारी 2023 मध्ये अखिलेश यादव एका परिषदेत सहभागी झाले होते. त्यांनी X खात्यावर 4 चित्रे पोस्ट केली. लिहिलं- नारायण साकार हरिचा संपूर्ण विश्वात सदैव जय होवो.भोले बाबाचे उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात अनुयायी आहेत. त्याचा एससी/एसटी आणि ओबीसी वर्गात खोलवर प्रवेश आहे. मुस्लिम समाजातील लोकही अनुयायी आहेत. बाबांचे यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवर पेजही आहे. यूट्यूबचे 31 हजार सबस्क्राइबर्स आहेत. फेसबुक पेजवरही जास्त लाईक्स नाहीत. पण, तळागाळात त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत.भोले बाबाची स्वतःची फौज आहे, ज्याला सेवादार म्हणतात. दर मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमाची संपूर्ण कमान हे सेवेदार घेतात. देशातून येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, भोजन आणि वाहतुकीची व्यवस्था सेवादार करतात.भोले बाबांच्या सत्संगाला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला पाण्याचे वाटप केले जाते. हे पाणी प्यायल्याने त्यांची समस्या दूर होते, अशी बाबांचे अनुयायी मानतात. एटा येथील बहादूर नगर गावात असलेल्या बाबाच्या आश्रमात दरबार भरतो. आश्रमाबाहेर एक हातपंपही आहे. दरबाराच्या वेळी या हातपंपाचे पाणी पिण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.
बाबाचा आश्रम 30 एकराचा, गाड्यांच्या ताफ्यासह फिरतो, दररोज 12,000 लोक आश्रमात येत
Date: