मेधा पाटकर यांना ५ महिन्यांची शिक्षा:10 लाख रुपयांचा दंड

Date:

साकेत

2001 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरुद्ध दिल्लीचे विद्यमान एलजी व्हीके सक्सेना यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. मानहानीच्या खटल्यात साकेत न्यायालयाने मेधा पाटकर यांना ५ महिन्यांची शिक्षा सुनावली.न्यायालयाने मेधा पाटकर यांना 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून दंडाची रक्कम व्हीके सक्सेना यांना देण्याचे निर्देश दिले आहेत.

मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट राघव शर्मा यांनी पाटकर यांना मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि सक्सेना यांच्या प्रतिष्ठेला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 10 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, न्यायालयाने वयाचे कारण देत युक्तिवाद फेटाळला. हा खटला 25 वर्षे चालल्याचे न्यायालयाने सांगितले.न्यायालयाने त्याची शिक्षा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३८९(३) अन्वये १ ऑगस्टपर्यंत स्थगित केली जेणेकरून तो आदेशाविरुद्ध अपील करू शकेल. न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना पाटकर म्हणाल्या, “सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही. आम्ही कोणाचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला नाही, आम्ही फक्त आमचे काम करतो. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देऊ.”२००३ सालापासून हे प्रकरण सुरु आहे. मेधा पाटकर यांचं नर्मदा वाचवा आंदोलन सुरु असताना त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा नोंद झाला. मेधा पाटकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना विनय कुमार सक्सेना यांच्या विरोधात आरोप केले होते.एका टीव्ही चॅनलवर पॅनलवर चर्चा करताना मेधा पाटकर यांनी आरोप केले होते. वीके सक्सेना यांना गुजरातच्या सरदार सरोवर निगमकडून सिव्हिल कंत्राट मिळाल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला होता. त्यानंतर सक्सेना यांनी सर्व आरोप फेटाळले होते. या आरोपानंतर सरदार सरोवर निगम लिमिटेडने गुजरात पोलिसांना पत्र लिहून आरोप फेटाळले होते.

निगम लिमिटेडने पत्रात म्हटलं होतं की, सक्सेना यांनी कधीही सिव्हिल कंत्राटासाठी सक्सेना यांनी विनंती केली नाही. निगमनेही त्यांच्या एनजीओलाही कोणत्याही प्रकारचं कंत्राट दिलं नाही’.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ठाकरेंचे 6 खासदार फुटले, लोकसभा अध्यक्षांची स्वतंत्र गटाला मंजुरी!

नवी दिल्ली- उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा...

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू

~ लाँच ऑफर: शून्य लॉगइन फी आणि ५० लाख रूपयांपर्यंत तात्काळ कर्ज मंजूरी ~ पुणे: आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“एबीएचएफएल”) या आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्‍या उपकंपनीने संपूर्ण भारतात वितरण नेटवर्कचा विस्तार करण्याच्या आपल्‍या व्यापक योजनेचा भाग म्हणून पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू केली आहे, ज्‍यासह महाराष्ट्रातील आपला विस्तार वाढवला आहे. या नवीन शाखेसह, एबीएचएफएलचे महाराष्ट्रातील एकूण नेटवर्क आता ३५ शाखांवर पोहोचले आहे, ज्यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील त्‍यांची उपस्थिती दृढ झाली आहे, तसेच ग्राहकांसाठी उपलब्धता अधिक सोपी झाली आहे. आयटी (माहिती तंत्रज्ञान), उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील प्रबळ उपस्थिती, तसेच मजबूत पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तारत चाललेली शहरी कनेक्टिव्हिटी यामुळे पुणे हे भारतातील सर्वात गतिमान निवासी बाजारपेठ राहिले आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणारे ग्राहक, पगारदार, स्वयंरोजगार असणारे व्यक्ती आणि महत्त्वाकांक्षी कुटुंबं, जी परवडणाऱ्या, अनौपचारिक आणि प्राईम हाउसिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घरांचा शोध घेत आहेत, त्यांच्याकडून गृहखरेदीसाठी सातत्याने मागणी दिसून येत आहे. आपल्या या नवीन शाखेच्या माध्यमातून एबीएचएफएल ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या गृहनिर्माण वित्त पुरवठा पर्यायांची (हाउसिंग फायनान्स सोल्युशन्स) उपलब्धता अधिक सहजसाध्य करेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैविध्यपूर्ण गृहखरेदीच्या गरजा अधिक सुलभतेने आणि सहजतेने पूर्ण करता येतील. एबीएचएफएल परवडणारी घरे, प्राईम हाऊसिंग, कन्स्ट्रक्शन फायनान्स आणि मालमत्तेवर कर्ज यांसह विविध ग्राहक घटकांसाठी तयार केलेल्या हाऊसिंग फायनान्‍स सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते. हे सोल्‍यूशन्‍स पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार व्यावसायिक, स्वयंरोजगार बिगर-व्यावसायिक आणि उदयोन्मुख उत्पन्न गटांच्या गरजा पूर्ण करतात. प्रबळ डिजिटल परिसंस्थेच्या पाठबळासह एबीएचएफएल विनासायास ऑनबोर्डिंग, जलद मंजूरी आणि सुधारित पारदर्शकता प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळतो. या लाँचच्या निमित्ताने, एबीएचएफएल शून्य लॉगइन फी सोबत ५० लाख रूपयांपर्यंतचे स्पॉट लोन सॅंक्शन (तात्काळ कर्ज मंजुरी) ऑफर करत आहे. ही ऑफर १७ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत वैध असेल, ज्यामुळे या नवीन शाखांमधील ग्राहकांना जलद आणि अधिक परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवणे शक्य होईल. या विस्तारीकरणाबाबत मत व्‍यक्त करत आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “महाराष्ट्र आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील प्रबळ मागणी आणि वाढत्या महत्त्‍वाकांक्षा पाहता ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमची प्रादेशिक उपस्थिती वाढवत आहोत. आमच्या वाढत्या वितरण नेटवर्कला प्रबळ डिजिटल क्षमतेची जोड देऊन ग्राहकांसाठी घर खरेदीचा प्रवास सोपा, जलद आणि त्रासरहित बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” आपल्या ‘हॅपी होम लोन जर्नी’ या आश्वासनाशी सुसंगत असलेला हा विस्तार एबीएचएफएलचे ग्राहक-केंद्रितता, जबाबदार कर्ज वाटप आणि वैविध्यपूर्ण व सखोल रिटेल पोर्टफोलिओच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला गती देण्यावर असणारा निरंतर भर सादर करतो.

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही-केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश पुणे -ऐतिहासिक वारसा...