Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सर्व धर्मीय ऐक्य दिंडीला चांगला प्रतिसाद !

Date:

पुणे :

पंढरपूर वारीनिमित्त  पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वधर्मीय ऐक्य दिंडी’ला चांगला प्रतिसाद मिळाला .मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक,रिझवानी मस्जिद ट्रस्ट,सुफी वारकरी विचारमंच आणि साखळीपीर तालीम  तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या विद्यमाने दि.१ जुलै रोजी सर्व धर्मीय ऐक्य दिंडीचे आयोजन सकाळी साडे दहा वाजता करण्यात आले .साखळीपीर तालीम(नाना पेठ) येथे सर्वधर्मीय धर्म गुरु,’डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी ‘चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार,साखळीपीर तालीमचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर,प्रशांत कोठडिया,ग्यानी प्रतापसिंह गुरूद्वारा गणेश पेठ,  दिंडी क्रमांक ३४ चे भास्कर मोरे महाराज,  ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी चे योगी निरंजन नाथ महाराज,भंते सुदस्सन महाराज बौद्ध धर्मगुरु यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. अंगरशा बाबा दर्गा मार्गे रिझवानी मस्जिद (गंज पेठ)येथे समारोप झाला.

शिवानी माळवदकर,रिझवानी मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त अंजुम भाई,सुफी वारकरी विचार मंचचे अध्यक्ष मशकूर अहमद शेख,सचिव उमर शरीफ शेख,आझम ट्रस्टचे विश्वस्त अब्दुल वहाब शेख यांनी संयोजन केले.सहभागी वारकऱ्यांना व्हेज बिर्याणी,शीरखुर्मा वाटप करण्यात  आले .’डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी ‘च्या वतीने वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात  आले. दिंडीचे हे पाचवे वर्ष होते. 

‘गेल्या अनेक वर्षांपासून सर्वधर्म दिंडी  साखळी पीर तालमीच्या वतीने काढण्यात येते, आणि या वारीत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आदी धर्मगुरू सहभागी होत असतात. या वारीत सहभागी होण्यासाठी डॉ.पी. ए. इनामदार हे देखील सहभागी होत असून ते   पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा पुढे चालवत आहेत ‘, असे गौरवोद्गार रवींद्र माळवदकर यांनी काढले. 

डॉ.पी. ए. इनामदार  म्हणाले, ‘मी स्वतः मुस्लिम असलो तरी मी सर्व धर्म समभाव मानणारा आहे, आणि मी कृतीशील सर्व धर्म समभाव पाळतो, म्हणूनच माझ्या शैक्षणिक संस्थेत सर्व धर्मीय शिक्षक,प्राध्यापक  आहेत,आम्ही सर्व धर्माच्या उपक्रमात सहभागी होतो. त्यामुळे आजच्या या सर्वधर्म दिंडीत सहभागी होताना मला आनंद होत आहे.पुणे हे धार्मिक एकोपा जपणारे शहर आहे.हा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’.              

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गायन-वादनाचा सुरेल संगम-पुणेकर रसिकांची भरभरून दाद

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रमपुणे : युवा कलाकार...

अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा:निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार,निधी वाटपावर भाजपचे आमदारही...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 अंतर्गत...

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे: रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण...