नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल – 3 वरील परदेशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच्या विमानतळावरील तपासणी प्रक्रियेशी संबंधित ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन – ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम’ या सुविधेचा प्रारंभ

Date:

नवी दिल्ली-केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल – 3 वरील परदेशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच्या विमानतळावरील तपासणी प्रक्रियेशी संबंधित ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन – ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम’ या सुविधेचा प्रारंभ केला. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहसचिव तसेच इतर अनेक मान्यवरही उपस्थित होते.

फास्ट ट्रॅक इमिग्रेशन – ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम (FTI- TTP) ही सुविधा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा दूरदर्शी उपक्रम आहे. भारतीय नागरिक तसेच परदेशस्थ भारतीय नागरिकत्व (Overseas Citizenship of India – OCI) कार्डधारकांच्या सोयीची ठरावी यादृष्टीने अगदी विचारपूर्वक या सुविधेला आकार दिला असल्याचे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. डिझाइन करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे इतर देशांतून येणारे भारतीय नागरिक आणि परदेशस्थ भारतीय नागरिकत्व कार्डधारक प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या उपक्रमाचा प्रारंभ हा विकसित भारत @2047 साठी निश्चित केलेल्या प्रमुख ध्येय उद्दिष्टांपैकीय एक आहे. ही सुविधा म्हणजे प्रत्येक प्रवाशाला सुलभतेने प्रवास करता येण्याजोग्या सुविधा उपलब्ध करून देणे प्रवासी सुविधांची परिणामकारता वाढणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबच असल्याचे ते म्हणाले. सर्व प्रवाशांसाठी ही सुविधा विना शुल्क उपलब्ध असणार असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानतळावरील परदेश प्रवासाठीच्या सर्व तपासणी प्रक्रिया अर्थात इमिग्रेशन क्लिअरन्स जलदगतीने, सुलभरित्या आणि सुरक्षितपणे पार पाडता याव्यात यादृष्टीने या सुविधेची रचना करण्यात आली आहे. हा उपक्रम ई – दरवाजा (ई – गेट) किंवा  स्वयंचलित सीमा दरवाजांचा (बॉर्डर गेट) उपयोग करून चालवला जाणार आहे, त्यामुळे विमानतळावरील परदेश प्रवासाठीच्या सर्व तपासणी प्रक्रियांमधील मानवी हस्तक्षेप कमी होऊ शकणार आहे. सद्यस्थितीत हा कार्यक्रम दोन टप्प्यांत राबवला जाणार आहे. या अंतर्गतच्या पहिल्या टप्प्यात भारतीय नागरिक आणि परदेशस्थ भारतीय नागरिकत्व कार्डधारकांना आणि दुसऱ्या टप्प्यात परदेशी प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वयंचलित दरवाजांद्वारे (ई-गेट्स) तपासणी केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवास करत असलेल्या प्रवाशांसाठी विमानतळावरील तपासणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येईल, अशा प्रकारची जागतिक दर्जाची सुविधा विकसित करत, आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करता यावा हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

फास्ट ट्रॅक इमिग्रेशन – ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम (FTI- TTP) या सुविधेअंतर्गतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे राबवली जाणार आहे. या कार्यकमाअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेच्या माध्यमातून विविध वर्गवारीतील प्रवाशांनुसार परदेश प्रवासासाठीची विमानतळावरील संपूर्ण तपासणी प्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठीच्या संपर्कवजा समन्वकयाची जबाबदारी ब्युरो ऑफ इमिग्रेशन या यंत्रणेकडे असणार आहे. या योजनेअंतर्गत नाव नोंदणी करण्यासाठी संबंधित प्रवासी अर्जदाराला आपले संपूर्ण तपशील आणि आवश्यक दस्तऐवजांसह पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. अर्ज दाखल झाल्यावर आवश्यक पडताळणीनंतर ‘विश्वासू प्रवाशांची’ श्वेतपत्रिकेस्वरुप यादी अर्थात White List of ‘Trusted Travellers’ ही यादी तयार केली जाईल, या यादीनुसार ई-गेट्सवरील प्रक्रियेची अंमलबजावणी व्हावी यासाठी ती अपलोड केली जाईल. ई-गेट्सवरून जाणाऱ्या ‘ट्रस्टेड ट्रॅव्हलर’ची बायोमेट्रिक्स अर्थात जीवशास्त्रीय ओळखीचे – तपासणीचे तपशील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाद्वारे (FRRO) गोळा केले जातील किंवा असे नोंदणीकृत प्रवासी विमानतळाच्या आवारात आल्यावर त्याचे तपशील घेतले जातील. ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम (FTI- TTP) अंतर्गतची ही नोंदणी अशा प्रवाशांच्या पासपोर्टच्या वैधतेच्या तारखेपर्यंत किंवा 05 वर्षे यांपैकी जे आधी संपणार असेल तोपर्यंत वैध असणार आहे. त्यानंतर अशा प्रवाशांना आपल्या नोंदणीचे पुन्हा एकदा नूतनीकरण करावे लागणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत असे ‘नोंदणीकृत प्रवासी’ ई – गेटवर पोहोचताच ते विमान कंपन्यांनी त्यांना दिलेला बोर्डिंग पास ई – गेटवर स्कॅन करून त्याच्या विमान उड्डाणाविषयीचा तपशील प्राप्त करू शकतात. यावेळी या प्रवाशांचा पासपोर्ट देखील स्कॅन केला जाईल तसेच  ई – गेटवर त्यांची जीवशास्त्रीय ओळखही पडताळून पाहिली जाणार आहे. प्रवाशाची खरी ओळख पटल्यानंतर आणि त्यांच्या जीवशास्त्रीय ओळखीचे प्रमाणीकरण झाल्यानंतर ई – गेट आपोआप उघडला जाईल आणि या प्रवाशांची परेदेशी प्रवासासाठीची विमानतळावरील संपूर्ण तपासणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असल्याचे गृहित धरले जाईल.

फास्ट ट्रॅक इमिग्रेशन – ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम (FTI- TTP) या उपक्रमाअंतर्गतची ही सुविधा देशभरातील 21 प्रमुख विमानतळांवर सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली विमानतळासह मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, कोची आणि अहमदाबाद अशा सात प्रमुख विमानतळांवर ही सेवा सुरू केली जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...