पुणे- एकेकाळी कॉंग्रेस चे नेते असलेले आणि आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असलेले माजी उपमहापौर दीपक मानकर यावेळी विधानसभेची निवडणूक लढणार कि नाही ? यावर आता कार्यकर्त्यात मोठी मंथने होताना दिसत आहेत.मानकर यांनी यापूर्वी कसबा विधानसभा लढविली आहे. त्यांच्याकडे कोथरूड आणि कसबा असे दोन पर्याय आहेत.महायुतीत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची शहरात ताकद वाढविण्यासाठी मानकर यांच्या नावाचाच मोठा फायदा झाला आहे.नुकतीच सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती लोकसभेसाठी मानकर यांनी केलेली प्रयत्नांची शर्थ आणि पक्ष बांधणीसाठी केलेले जोरदार प्रयत्न पाहता त्यांना कसबा किंवा कोथरूड मधून विधानसभेची महायुतीने उमेदवारी दिली पाहिजे असे कार्यकर्ते सांगत आहेत.मानकर यांनी याबाबत अद्याप काहीही भूमिका स्पष्ट न केल्याने दीपक मानकर विधानसभा लढणार कि नाही ? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.आठ विधानसभा मतदार संघापैकी २ विधानसभा मतदार संघात अजित पवार गटाचे आणि ६ विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. यापैकी हडपसर मध्ये अजित पवार गटाचे चेतन तुपे आणि वडगाव शेरी मध्ये सुनील टिंगरे या दोहोंचे बाबतीत आता पुन्हा उमेदवारी द्यायची कि नाही यावर पक्ष विचार करणार आहे.अगरवाल पोर्शे कार अपघात प्रकरणी टिंगरे यांची प्रतिमा खालावली आहे तर तुपे यांनाही शिवसेनेच्या शिंदे गटाचे नाना भानगिरे यांचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. कोथरूड मध्ये सध्या भाजपचे चंद्रकात दादा भक्कम स्थितीत आहेत.कसब्यात रासनेंचा पराभव कॉंग्रेसने केलेला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी खंबीर उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाणार आहे ते मानकर आता कुठून लढणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.